आमदार निलेश लंकेंच्या कोविड सेंटरची योगी आदित्यनाथांनाही भुरळ
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील आहे. अनेक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थाही कोविड सेंटर उभारणीपासून वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मदत करत आहेत. महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी लोकसहभागातून उभारलेल्या कोविड सेंटरची चांगलीच चर्चा आहे. आता या कोविड सेंटरची उत्तर प्रदेश सरकारलाही भूरळ पडली आहे. उत्तर […]
ADVERTISEMENT
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील आहे. अनेक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थाही कोविड सेंटर उभारणीपासून वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मदत करत आहेत. महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी लोकसहभागातून उभारलेल्या कोविड सेंटरची चांगलीच चर्चा आहे. आता या कोविड सेंटरची उत्तर प्रदेश सरकारलाही भूरळ पडली आहे.
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार तिवारी यांची आणि आमदार निलेश लंकेची फोनवरुन चर्चा झाली. ज्यात उत्तर प्रदेशातली लोकसहभागातून कोविड सेंटर ऊभारणीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचं तिवारी यांनी सांगितलं. पारनेरच्या भाळवणी येथे निलेश लंके यांनी उभारलेली कोविड सेंटर चांगलंच चर्चेत आहे. ११०० बेड्सची सोय असलेल्या या कोविड सेंटरमध्ये कारभार कसा चालतो, औषधोपचार कसे केले जातात, दैनंदिन उपक्रम, रुग्णांची देखभाल, जेवणाची व्यवस्था या सर्व गोष्टींसाठी लंके यांनी यंत्रणा कशी उभारली याबद्दल तिवारी यांनी माहिती घेतली.
आमदार लंके यांनीही या चर्तेत कोविड सेंटरच्या उभारणीपासून ते रुग्णांची काळजी कशी घेतली जाते याबद्दलची माहिती तिवारी यांना दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे आमदार निलेश लंके हे स्वतः या कोविड सेंटरमध्येच राहत असून रुग्णांवर होत असलेल्या उपचारांवर ते लक्ष ठेवून आहेत. कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर केले जाणारे मोफत उपचार, जेवणाची मोफत सोय, रुग्णांच्या करमणुकीसाठी योग साधना व इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत या कोविड सेंटरला भेट दिली असून निलेश लंकेंच्या कामाचं कौतुक होताना दिसत आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT