अखेर मुहूर्त ठरला! योगी आदित्यनाथ ‘या’ दिवशी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत इतिहास घडवणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. मागील काही दिवसांपासून नव्या सरकारच्या स्थापनेबद्दलच्या सुरू होत्या. आता शपथविधीची तारीख निश्चित झाली असून, २५ मार्च रोजी योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवला. सलग दुसऱ्यांदा बहुमतापेक्षा अधिक जागा मिळवत योगी आदित्यनाथ यांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. २५ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता ते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

भाजपला खरोखरच महिला मतदारांमुळे ऐतिहासिक विजय मिळाला?

हे वाचलं का?

हा शपथविधी सोहळा लखनौतील इकाना स्टेडिअमवर होणार आहे. या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. या खास प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि भाजप शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे.

सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं असून, २० मार्च रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उत्तर प्रदेशच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. ते २० मार्च रोजी गोरखपूर येथे दाखल होणार आहेत. या दौऱ्यात सरसंघचालक संघाच्या पदाधिकारी आणि स्वयंसेवकांच्या बैठका घेणार आहेत.

ADVERTISEMENT

भाजपने उत्तर प्रदेश जिंकलं, मोदी म्हणतात तसं २०२४ लोकसभेचे निकाल निश्चीत झालेत का?

ADVERTISEMENT

शपथविधी सोहळा दणक्यात करण्याची भाजपची योजना असून, त्यासाठी मोठी तयारी केली जात असल्याची माहिती आहे. प्रत्येक जिल्ह्यात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. भाजपने उत्तर प्रदेशातील सरकार तयार करण्याची जबाबदारी अमित शाह आणि रघुवर दास यांच्यावर सोपवलेली आहे. त्यांना पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केलेलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT