Sharad Pawar यांच्या प्रेमापोटी कार्यकर्त्याने पाठीवर काढला Tattoo
वसंत मोरे, प्रतिनिधी, बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रेमापोटी एका कार्यकर्त्याने त्याच्या पाठीवर टॅटू काढला आहे. कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी वाटेल ते करायला तयार असतात. एखाद्या नेत्याचा प्रभाव पडला तर त्याच्यासाठी वाट्टेल ते करणारे अनेक कार्यकर्ते आपण पाहतो. बारामतीमधल्या अशाच एका कार्यकर्त्याने प्रेमापोटी आपल्या पाठीवर शरद पवारांचा टॅटू काढला आहे. हा टॅटू कायमस्वरूपी […]
ADVERTISEMENT
वसंत मोरे, प्रतिनिधी, बारामती
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रेमापोटी एका कार्यकर्त्याने त्याच्या पाठीवर टॅटू काढला आहे. कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी वाटेल ते करायला तयार असतात. एखाद्या नेत्याचा प्रभाव पडला तर त्याच्यासाठी वाट्टेल ते करणारे अनेक कार्यकर्ते आपण पाहतो. बारामतीमधल्या अशाच एका कार्यकर्त्याने प्रेमापोटी आपल्या पाठीवर शरद पवारांचा टॅटू काढला आहे. हा टॅटू कायमस्वरूपी आहे.
अक्षय साळवे अस टॅटू पाठीवर काढलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. अक्षय हा मूळचा बारामती तालुक्यातील मेदड इथला आहे. तो मुंबईत व्यवसायानिमित्त स्थायिक आहे. विधानसभेच्या सातारा येथील प्रचार सभेवेळी शरद पवार पावसात भिजले. त्याच सभेमुळे महाराष्ट्रातले राजकीय चित्र पालटले. त्यामुळे अक्षय भारावून गेला. आपल्या लाडक्या नेत्याचं कायम स्मरण राहावं यासाठी अक्षयने आपल्या पाठीवर परमनंट टॅटू काढला. मुंबईतल्या संदीप जोशी या कलाकाराने हा टॅटू अक्षयच्या पाठीवर काढला आहे. हा टॅटू काढल्यापासून अक्षय शरद पवारांना भेटण्यासाठी उत्सुक होता. अखेर तब्बल दीड वर्षानंतर अक्षयला आपल्या लाडक्या नेत्याला भेटता आले. दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर अक्षयने शरद पवारांना पाठीवर काढेलला टॅटू दाखवला. यावेळी शरद पवारांनी अक्षयचे भरभरून कौतुक केलं.
हे वाचलं का?
मी टॅटू काढला आहे शरद पवार यांचा. दीड वर्षांनी माझी शरद पवार यांची भेट झाली. त्यांना मी माझा टॅटू पाहिल्यानंतर अभिनंदन केलं. मी कायमस्वरूपी टॅटू माझ्या पाठीवर काढून घेतला आहे. मला शरद पवार यांच्या विषयी वाटणाऱ्या प्रेमातून आणि आपुलकीतून मी हा टॅटू काढून घेतला आहे असंही या अक्षय साळवेने सांगितलं. शरद पवार यांनी माझं कौतुक केलं त्यामुळे मी भारावून गेलो आहे. मला त्यांची भेट झाली याचा खूप आनंद झाला आहे असंही या अक्षय साळवेने सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT