वेफर्सचं पाकिट अंगणात फेकल्याच्या रागातून तरूणाने केली वृद्धाची हत्या, अकोल्यातली घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

धनंजय साबळे, प्रतिनिधी, अमरावती

ADVERTISEMENT

अकोल्यातील गुलजारपुरा भागात नातवाने वेफर्सचं रिकामं पाकिट अंगणात फेकल्याच्या रागातून एका युवकाने वृद्धाची हत्या केली आहे. बुधवारी रात्री अकरा वाजता अकोल्यात ही घटना घडली. बुधवारी रात्री 11 च्या सुमारास या वृद्धावर तरूणाने हल्ला केला. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेत वृद्धाचा रात्री उशिरा मृत्यू झाला.

या प्रकरणी अकोला पोलिसांनी आकाश जोटांगे (वय-32) या तरूणाला अटक केली आहे. डाबकी रोडचे ठाणेदार शिरीष खंडारे यांनी ही माहिती दिली आहे. गुलाजरपुरा भागात राहणारे संतोष मोरे (वय-55) यांच्या नातवाने काही दिवसांपूर्वी आकाश ज्या ठिकाणी राहतो त्या घराच्या अंगणात वेफर्सचे रिकामे पाकिट फेकले होते. यावरून आकाश आणि संतोष मोरे यांच्यात वाद झाला. त्यानंतर आकाश जोटांगेने संतोष मोरेंवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

पुणे: 5 ते 6 जणांच्या टोळक्याकडून बाप-लेकाची हत्या, कोयत्याने केले वार

गुलजारपुरा भागात राहणारे संतोष मोरे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. शेजाऱ्यांच्या मदतीला ते धावून जात असत. आरोपी आकाश जोटांगे याची आई जेव्हा आजारी होती तेव्हा त्या आजारपणात संतोष मोरेंनी बरीच मदत केली होती. मोरे हे अनेकदा जोटांगे कुटुंबाची मदत करत असत. अशात संतोष मोरे यांच्या नातवाने वेफरचं रिकामं पाकिट आकाश राहतो त्या घराच्या अंगणात फेकलं. याचाच राग मनात ठेवून आकाशने संतोष मोरेंवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

आकाश रात्री अकराच्या सुमारास संतोष मोरेंकडे आला. त्याने तुमच्या नातवाने वेफर्सचं पाकीट आमच्या दारात का फेकलं असा जाब त्यांना विचारला. त्यानंतर शिवीगाळही केली. त्यांना घराबाहेर बोलवत त्यांच्या धारदार शस्त्राने हल्ला केला आणि वारही केले. गंभीर जखमी झालेल्या संतोष मोरे यांना लगेचच रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी आकाश जोटांगेला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT