जिवावर उदार होत वाचवले युवकाचे प्राण; विठ्ठलवाडी स्थानकातील घटना CCTV कैद
–मिथिलेश गुप्ता, कल्याण बराच वेळ तो प्लॅटफॉर्म उभा होता. प्लटफॉर्मच्या अगदी टोकावर उभं राहून दोन्ही बाजूकडे बघत होता. त्यामुळे तो गाडीची वाट बघत असावा, असंच वाटतं होतं, पण अचानक गाडी येत असल्याची चाहूल लागली. गाडी जवळ येत असल्याचं दिसताच त्याने प्लटफॉर्मवरून खाली उडी मारली आणि रेल्वेरुळावर उभा राहिला. त्याचा शेवट होणार असं वाटत असतानाच पोलिसांनी […]
ADVERTISEMENT
–मिथिलेश गुप्ता, कल्याण
ADVERTISEMENT
बराच वेळ तो प्लॅटफॉर्म उभा होता. प्लटफॉर्मच्या अगदी टोकावर उभं राहून दोन्ही बाजूकडे बघत होता. त्यामुळे तो गाडीची वाट बघत असावा, असंच वाटतं होतं, पण अचानक गाडी येत असल्याची चाहूल लागली. गाडी जवळ येत असल्याचं दिसताच त्याने प्लटफॉर्मवरून खाली उडी मारली आणि रेल्वेरुळावर उभा राहिला. त्याचा शेवट होणार असं वाटत असतानाच पोलिसांनी क्षणार्धात त्यांच्या दिशेने झेप घेतली आणि त्याला मृत्यूच्या उंबरठ्यावरून मागे खेचलं. ही घटना घडली विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवर…
विठ्ठलवाडी स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या मेल समोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या १८ वर्षीय युवकाचा पोलीस नाईक ऋषीकेश माने यांच्या धाडसामुळे जीव वाचल्याची घटना बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
माने यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता या युवकाच्या मागोमाग रेल्वेरुळावर उडी मारून त्याला रुळावरून बाहेर ढकलत त्यांनी त्याचा जीव वाचवला. या घटनेनंतर माने यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
हे वाचलं का?
काय घडलं?
उल्हासनगर ५ मधील प्रेमनगर टेकडी परिसरात राहणारा कुमार पुजारी हा १८ वर्षीय तरुण आज दुपारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या फलाटावर बराच वेळ उभा असल्याने या फलाटावर ड्युटीवर असलेल्या माने यांनी त्याच्यावर लक्ष ठेवले होते. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मदुराई एक्स्प्रेस विठ्ठलवाडी स्थानकात दाखल होत असताना गाडीचा वेग जास्त असतानाही कुमार याने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने चालत्या गाडीसमोर उडी मारली.
ADVERTISEMENT
त्याच्याच मागे असलेल्या माने यांना क्षणार्धात काय घडणार याची कल्पना आल्याने त्यांनी स्वताच्या जिवाची पर्वा न करता त्याच्या मागोमाग रुळावर उडी मारली आणि क्षणार्धात त्याला पुढच्या ट्रॅकमध्ये ढकलत स्वतःही बाहेरच्या उडी घेतली. सगळं घडत असताना वायू वेगाने मेल धडधडत निघून गेली.
विठ्ठलवाडी स्थानकातील घटना
पोलिसमुळे वाचले तरुणाचे प्राण pic.twitter.com/fMNxy4LWLF— Bhagwat Hirekar (@BHirekar) March 24, 2022
डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर घडलेल्या घटनेनं प्रवाशांसह सर्वाचा श्वास रोखला गेला होता, मात्र मेल निघून गेल्यानंतर या युवकासह माने यांना सुखरुप पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला. पोलिसांनी या युवकाला कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात आणून त्याच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावले. या तरुणाचे पोलिसांनी समुपदेशन केले. तर तरुणाचे प्राण वाचविणाऱ्या माने यांचंही कौतुक केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT