पूर्ववैमनस्यातून उल्हासनगरमध्ये तलवारीचे वार करून युवकाची हत्या, पाच जण अटकेत
मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी उल्हासनगरमध्ये एका युवकाची हत्या पूर्व वैमनस्यातून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दिवसा ढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा उल्हासनगर शहरात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न विचारला जातो आहे. पूर्व वैमनस्यातून उल्हास नगरमध्ये तलवार आणि चाकूचे वार करून एका तरूणाची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर आरोपी पसार झाले. मात्र या […]
ADVERTISEMENT
मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी
ADVERTISEMENT
उल्हासनगरमध्ये एका युवकाची हत्या पूर्व वैमनस्यातून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दिवसा ढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा उल्हासनगर शहरात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न विचारला जातो आहे. पूर्व वैमनस्यातून उल्हास नगरमध्ये तलवार आणि चाकूचे वार करून एका तरूणाची हत्या करण्यात आली.
या घटनेनंतर आरोपी पसार झाले. मात्र या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एक तासात कारवाई सुरू केली. आत्तापर्यंत पाच जणांना पोलिसांनी या हत्येप्रकरणी अटक केली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर नेताजी चौक कॉम्प्लेक्समधील बंगला कॉम्प्लेक्समध्ये जुन्या वादातून सुशांत उर्फ गुडिया गायकवाड याच्यावर भरदिवसा हल्ला केला. तलावर, लोखंडी रॉड आणि चाकूने वार केल्याने सुशांत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सुशांत अर्धा तासापेक्षा जास्त काळ रस्त्यावर तडफडत होता मात्र कोणीही त्याच्या मदतीला आलं नाही. पोलीस या ठिकाणी पोहचले तेव्हाही तो तडफडत होता, सुशांतला पोलिसांनी मध्यवर्ती रूग्णालयात दाखलं केलं मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
हे वाचलं का?
सुशांत गायकवाड आणि त्याचे मारेकरी एकमेकांना चांगले ओळखत होते, मात्र मृत सुशांत गायकवाडचा मित्र याने सांगितले की, मारेकऱ्यांना माहित होते की आम्ही नेताजी चौकात नेहमी सिगारेट पीत असतो आणि ते आमच्यावर पाळत ठेवून होते आणि ही हत्या घडवून आणली आहे.
ADVERTISEMENT
आज घडलेल्या या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा गुंडांनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. गुंडांना पोलिस प्रशासनाची भीती नाही. तसेच दिवसाढवळ्या हत्या झाल्यास नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होईल. यासाठी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना वेळीच लगाम घालण्याची गरज आहे अशीही अपेक्षा लोकांकडून व्यक्त होते आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT