आदित्य ठाकरेंना शिंदे गटाकडून मोठा धक्का! विदर्भात युवा सेनेला मोठं खिंडार

मुंबई तक

उद्धव ठाकरेंना आव्हान देत बंड केल्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेना पक्षावरच दावा करण्यात आलाय. सध्या हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात न्यायप्रविष्ट असताना आता शिंदे गटाने आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला मोठं खिंडार पाडलंय. पूर्व विर्दभातील युवा सेनेच्या सात जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. ४० बंडखोर आमदारांविरोधात महाराष्ट्रभर फिरत असलेल्या आदित्य ठाकरेंना हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

उद्धव ठाकरेंना आव्हान देत बंड केल्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेना पक्षावरच दावा करण्यात आलाय. सध्या हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात न्यायप्रविष्ट असताना आता शिंदे गटाने आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला मोठं खिंडार पाडलंय. पूर्व विर्दभातील युवा सेनेच्या सात जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. ४० बंडखोर आमदारांविरोधात महाराष्ट्रभर फिरत असलेल्या आदित्य ठाकरेंना हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड केलं. भाजपसोबत घरोबा करत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीही झाले. त्यानंतर शिंदेंनी थेट शिवसेनेवरचा ताबा घेण्याचा प्रयत्न केलाय. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आता शिंदे गटाने विदर्भात आणखी झटका दिलाय.

शिवसेनेचे ४० आमदार आणि अनेक जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी आपल्या बाजूने वळवल्यानंतर शिंदेंच्या सेनेनं उद्धव ठाकरेंना विदर्भातच आदित्य ठाकरेंना जबर धक्का दिलाय. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे विदर्भाचे प्रमुख किरण पांडव यांनी ‘मुंबई Tak’ याबद्दलची माहिती दिली.

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत पूर्व विदर्भातील युवासेनेचे हे पदाधिकारी शिंदे गटामध्ये सहभागी झाले’, असल्याचं ते म्हणाले.