Zydus च्या कोरोनावरच्या Virafin औषधाला DCGI ची तातडीच्या वापरासाठी संमती
Zydus च्या व्हिराफिन या औषधाला DCGI ने तातडीच्या वापराची संमती दिली आहे. कोव्हिड 19 वर हे औषध असणार आहे. हे औषध 91.15 टक्के प्रभावी असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. हे औषध घेतल्यानंतर कोरोना झालेल्या रूग्णाची RTPCR टेस्ट निगेटिव्ह येईल असंही कंपनीने म्हटलं आहे. या औषधामुळे रूग्णाला बाहेरून करावा लागणारा ऑक्सिजनचा पुरवठाही कमी होऊ शकतो असाही दावा […]
ADVERTISEMENT
Zydus च्या व्हिराफिन या औषधाला DCGI ने तातडीच्या वापराची संमती दिली आहे. कोव्हिड 19 वर हे औषध असणार आहे. हे औषध 91.15 टक्के प्रभावी असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. हे औषध घेतल्यानंतर कोरोना झालेल्या रूग्णाची RTPCR टेस्ट निगेटिव्ह येईल असंही कंपनीने म्हटलं आहे. या औषधामुळे रूग्णाला बाहेरून करावा लागणारा ऑक्सिजनचा पुरवठाही कमी होऊ शकतो असाही दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे कोरोनाचे रूग्ण महाराष्ट्रासह देशभरात वाढत असताना हे औषध आता महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
1 मे नंतर महाराष्ट्रातल्या 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण शक्य आहे का ?
कोरोना झाल्यानंतर जर सुरुवातीलाच रूग्णाला हे औषध दिलं गेलं तर कोरोनातून बरं होण्यासाठी हे Virafin औषध मोलाची कामगिरी करू शकतं. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानंतरच हे औषध रूग्णाला दिलं जाईल. हे औषध रूग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहे. या औषधाला तातडीची संमती मिळण्याच्या आधी भारतातल्या 25 केंद्रावर या औषधाची चाचणी घेण्यात आली. त्याचे रिझल्ट्स चांगले आले आहेत. हे औषध घेतल्यानंतर अनेकांची कोरोना टेस्ट सात दिवसांमध्ये निगेटिव्ह आली असंही कंपनीने म्हटलं आहे.
हे वाचलं का?
महाराष्ट्रात 45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरण पूर्ण होण्यास लागणार 112 दिवस
कोरोनाशी लढा देणं हे गंभीर आव्हान
ADVERTISEMENT
देशात कोरोनाचं संकट वाढतं आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रभाव वाढतो आहे. मागच्या दोन महिन्यांत ६ लाखांपेक्षा जास्त लोक पॉझिटिव्ह झाले आहेत. आता कोरोना झालेल्यांना लसीकरणाचाच आधार आहे. अशात आता झायडसचं हे औषध हे महत्त्वाचं ठरणार आहे. भारतात सध्या सिरम इन्स्टिट्युटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसी आहेत. लवकरच रशियाची स्पुटनिक व्ही देखील लवकरच भारतात उपलब्ध होऊ शकते.
ADVERTISEMENT
कोरोना, काळजी आणि लसीकरण तुमच्या मनातल्या प्रश्नांना डॉ. रवि गोडसेंनी दिली आहेत उत्तरं
भारतात आता लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील सगळ्यांना लस दिली जाणार आहे. या टप्प्यात राज्य सरकारांना, खासगी रूग्णालयांना थेट लस निर्मिती करणाऱ्यांकडून थेट लस घेता येणार आहे. आत्तापर्यंत देशात 13 कोटी पेक्षा जास्त लसी देण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT