ऐकावं ते नवलच! ब्रँडेड कुंकू न वापरल्यामुळे मुलाने लग्नचं मोडलं - Mumbai Tak - strange things marriage broke over low branded kumkum use in engagement - MumbaiTAK
बातम्या

ऐकावं ते नवलच! ब्रँडेड कुंकू न वापरल्यामुळे मुलाने लग्नचं मोडलं

आतापर्यंत लग्न मोडण्याची अनेक कारण आपण पाहिली असतील. परंतू पालघर जिल्हातील एका घटनेत नवऱ्या मुलाने साखरपुड्याच्या सोहळ्याला हलक्या प्रतीचं कुंकू लावल्याचं कारण देत आपलं लग्नचं मोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर नवऱ्या मुलीच्या घरातल्या लोकांनी वाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत घडलेल्या प्रकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अजब कारण देऊन लग्न मोडल्याचं हे प्रकरण सध्या […]

आतापर्यंत लग्न मोडण्याची अनेक कारण आपण पाहिली असतील. परंतू पालघर जिल्हातील एका घटनेत नवऱ्या मुलाने साखरपुड्याच्या सोहळ्याला हलक्या प्रतीचं कुंकू लावल्याचं कारण देत आपलं लग्नचं मोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर नवऱ्या मुलीच्या घरातल्या लोकांनी वाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत घडलेल्या प्रकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अजब कारण देऊन लग्न मोडल्याचं हे प्रकरण सध्या पालघर आणि वाडा परिसरात चर्चेचा विषय बनलं आहे.

भिवंडी तालुक्यातील घोटगाव येथील सिव्हील इंजिनीअर असलेल्या मुलाचं वाडा येथील मुलीसोबत लग्न ठरलं होतं. मुलगा आणि मुलगी दोन्ही उच्चशिक्षीत असल्यामुळे पुढे लग्नकार्यात कोणतंही विघ्न येणार नाही अशी सर्वांना खात्री होती. दोन दिवसांपूर्वी मुलीच्या घरी वाडा येथे साखरपुड्याचा सोहळा पार पडला. मात्र सोहळा उरकून घरी पोहचल्यानंतर हा मुलगा मुलीकडच्या लोकांना प्रतिसाद देत नव्हता.

अखेरीस मुलीच्या वडिलांनी नवऱ्या मुलाच्या काकांना फोन करत याबाबत विचारणा केली. यावेळी बोलत असताना तुम्ही कार्यक्रमात हलक्या प्रतीचं कुंकू वापरल्यामुळे आता हे लग्न होऊ शकणार नाही असं कारण मुलाच्या घरच्यांनी दिलं. मुलाच्या घरच्यांनी दिलेल्या या हास्यास्पद कारणानंतर धक्का बसलेल्या मुलीच्या वडिलांनी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गेला आहे. या घटनेनंतर वाडा पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 2 =

विस्मरणाचा असेल आजार तर एवढंच करा दुधामध्ये फक्त ‘ही’ चार पानं टाका Tadoba: सगळ्यांसमोर भिडले दोन वाघ, रक्तबंबाळ झाले अन्.. दररोज Squats करा; मिळतील ‘हे’ 7 अप्रतिम फायदे! फिरायचा प्लान करताय? मुंबईपासून काही अंतरावर असलेली ‘ही’ ठिकाणं करा Explore रम आणि ब्रँडीमध्ये ‘हा’ आहे फरक… ‘या’ 5 टेक्निक्सने Hip Fat झटपट करा दूर! Team India सोबत विमानात कोण होती ती ‘मिस्ट्री गर्ल’, पाहा PHOTO सनी देओल दिसला दारूच्या नशेत, व्हिडीओ व्हायरल… ‘Animal’ मध्ये रणबीरसोबत रोमान्स, अभिनेत्रीचा ग्लॅमरस-हॉट लुक पाहिला का? Top 10 बेस्ट केटो डाएट फॉलो करून करा Weight Loss Weight Loss: महिन्याभरातच कसं व्हायचं स्लिम-फिट? दररोज नारळ पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात? Archies: नातवाचा ग्रँड डेब्यू; धाकट्या भावासोबत पहिल्यांदाच दिसले अमिताभ बच्चन! गाजराचा हलवा बनवताय? मग लक्षात ठेवा ‘या’ छोट्या टिप्स… डॉ. बाबासाहेबांबद्दल 10 खास गोष्टी, तुम्हाला किती माहितीये? तुमचं सौंदर्य चाळीशीतही राहील सुंदर अन् निरागस; फक्त ‘या’ 3 गोष्टी नेहमी करा फॉलो! Rashmika Mandanna टोन आणि फिट फिगरसाठी घेते ‘हे’ सीक्रेट डाएट! Weight Loss 6 Low-Calorie Dinner: रात्री जरा कमी जेवा, कारण… Daman: मुंबईपासून एकदम जवळ, Vacation साठी हटके लोकेशन ते ही अगदी स्वस्तात