रोहा : बारावीच्या परीक्षेच्या भीतीने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यभरात बारावीच्या परीक्षांना ऑफलाईन पद्धतीने सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे एका विद्यार्थ्याने परीक्षेच्या आधीच गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. प्रकाश बांगारे असं या विद्यार्थ्यांचं नाव असून त्याने आपल्या शाळेबाहेरील जंगलात गळफास घेतल्याचं कळतंय.

गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन वर्गांमुळे प्रकाशचा व्यवस्थित अभ्यास झाला नव्हता. त्यातच यंदा बोर्डाने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रकाश चिंतेत होता. प्रकाश रोहा तालुक्यातील सानेगाव येथे शिकायला होता. परंतू गावात इंटरनेटची चांगली सोय नसल्यामुळे अनेकदा ऑनलाईन अभ्यासांत व्यत्यय यायचा.

त्यातच यंदाची बोर्डाची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असा निर्णय जाहीर झाल्यानंतर प्रकाश आणखीनच चिंतेत गेला. याच भीतीतून त्याने ४ मार्चला गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेमुळे रोहा परिसरात खळबळ उडाली असून प्रकाशसारखे अनेक विद्यार्थी तणावाखाली आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शेतकऱ्याच्या जन्माला परत कधीच येणार नाही ! विषप्राशन करुन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

    follow whatsapp

    ADVERTISEMENT