Drugs Case सुभाष घई यांनी पोस्ट केला 30 वर्षांपूर्वीचा फोटो, का होतेय इतकी चर्चा?

जाणून घ्या काय आहे तो फोटो आणि का होते आहे इतकी चर्चा?
Drugs Case सुभाष घई यांनी पोस्ट केला 30 वर्षांपूर्वीचा फोटो, का होतेय इतकी चर्चा?
Subhash Ghai Shared an old picture of Of Actors Protesting Against Drug Use Due to amid Mumbai Drugs Burst

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. NCB ने दिलेल्या माहितीनुसार आर्यनकडे ड्रग्ज सापडलं नाही, मात्र त्याचा मित्र अरबाझ मर्चंटकडे 6 ग्रॅम चरस आढळून आलं असं सांगितलं जातं आहे. या प्रकरणी कोर्टात सतीश मानेशिंदे यांनी माहिती दिली. दुसऱ्याकडे ड्रग्ज असल्याची शिक्षा माझ्या अशीलाला का दिली जाते आहे? असा प्रश्न मानेशिंदे यांनी म्हटलं आहे. सध्या आर्यन खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या सगळ्या वादंगादरम्यान सुभाष घई यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो तीस वर्षांपूर्वीचा आहे. मात्र तरीही या फोटोची चर्चा रंगली आहे.

सुभाष घई यांनी त्यांच्या कू अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. यासोबतच सुभाष घई म्हणतात, '1990 मध्ये मीडियाने हे पाहिलं की बॉलिवूडचे फिल्म स्टार्सनी ड्रग्जच्या विरोधात आवाज उठवला होता. या स्टार्समध्ये गुलशन ग्रोव्हर, जितेंद्र, विनोद खन्ना, आमिर खान, अमिताभ बच्च, मिथुन, जॅकी श्रॉफ, डिंपल, शबाना आझमी, पद्मनी कोल्हापुरे, टीना खन्ना यांच्यासहीत अनेक व्हीआयपी लोकही होते.' हा इव्हेंट सुभाष घई यांनी आयोजित केला होता. या फोटोत हे दिसतं आहे की जे तारे-तारका जमले आहेत त्यांच्या हातात असलेल्या फोटोवर एक ओळ लिहिली आहे, We Love Life, We Hate Drugs अशी ती ओळ आहे. कू वर हा फोटो पोस्ट करून सुभाष घई यांनी म्हटलं आहे की बॉलिवूडने कायमच ड्रग्जचा विरोध केला आहे.

गेल्या काही दिवसांपून क्रूझ ड्रग्ज पार्टीची चांगली चर्चा होते आहे. या पार्टीसाठी गेलेल्या आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. तसंच काल त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. मात्र त्याला जामीन मिळालेला नाही. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आणि एनसीबीवर आरोप केले आहेत. तसंच उद्या म्हणजेच शनिवारी ते या प्रकरणात भाजप नेत्याच्या मेहुण्याला क्रूझवरून कसं जाऊ दिलं त्याचा व्हीडिओही दाखवणार आहेत. एनसीबी विरूद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष रंगलेला असताना सुभाष घई यांनी पोस्ट केलेला हा फोटोही चर्चेचा विषय ठरतो आहे.

2 ऑक्टोबरच्या रात्री आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचा या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर त्यांच्यासह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आता हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं आहे. याबाबत शाहरुख खानने काहीही वक्तव्य अद्याप केलेलं नाही. मात्र हे नक्की आहे की त्याने त्याचं शुटींग थांबवलं आहे. शाहरुख त्याच्या पठाण या सिनेमाचं शुटिंग करत होता मात्र आता त्याने हे चित्रीकरण काही काळ थांबवलं आहे. या सिनेमाच्या काही भागाचं चित्रीकरण करण्यासाठी शाहरुख स्पेनला जाणार होता मात्र तो दौराही त्याने रद्द केला आहे. आर्यन तुरुंगातून सुटत नाही तोपर्यंत शाहरुख मुंबईतच असणार आहे.

Related Stories

No stories found.