'कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही', किरण मानेंच्या समर्थनार्थ राजकीय नेते मैदानात

'कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही', किरण मानेंच्या समर्थनार्थ राजकीय नेते मैदानात

राजकीय भूमिका घेतो म्हणून मालिकेतून काढून टाकल्याचा किरण मानेंचा दावा

स्टार प्रवाह चॅनलवर मुलगी झाली हो या मालिकेत काम करणारा अभिनेता किरण मानेला राजकीय भूमिका घेतो म्हणून सिरीअल मधून काढून टाकल्याचं प्रकरण सध्या चांगलंच गाजतं आहे. अभिनेता किरण मानेने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आणि आपल्या फेसबूक पोस्टच्या माध्यमातून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सोशल मीडियावर हे प्रकरण गाजत असतानाच आता यात राजकीय नेत्यांनीही उडी घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही किरण मानेला आपला पाठींबा दाखवत आपली भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राचा वैचारीक वारसा जोपासत तुमच्या विरोधात लिहीले म्हणुन तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही असं म्हणत आव्हाड यांनी स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रशासनावर टीका केली आहे.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही किरण माने यांना आपला पाठींबा दर्शवत भाजपवर टीका केली आहे.

याव्यतिरीक्त सोशल मीडियावरही अभितेना किरण माने यांना नेटकऱ्यांकडून पाठींबा मिळत आहे.

किरण माने हे आपल्या सशक्त अभिनयासह परखड मतांसाठी ओळखले जातात. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी अनेक राजकीय विषयांवर उघडपणे भूमिका घेत प्रस्थापित केंद्र सरकारवर टीकाही केली आहे. शेतकरी आंदोलन असो किंवा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात किरण मानेंनी आपली सडेतोड भूमिका सोशल मीडियावर मांडली होती. यावरुन त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला होता. अद्याप या प्रकरणात स्टार प्रवाह वाहिनीची बाजू अद्याप समोर आलेली नाहीये. त्यामुळे या प्रकरणात पुढे नेमकं काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

'कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही', किरण मानेंच्या समर्थनार्थ राजकीय नेते मैदानात
राजकीय भूमिका घेतल्यामुळे अभिनेता किरण मानेला मालिकेतून काढलं? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in