'झुंड़ मे तो सुअर आते है', शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राणे समर्थकांची पोस्टरबाजी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निकालांवरुन शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा शीतयुद्ध
'झुंड़ मे तो सुअर आते है', शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राणे समर्थकांची पोस्टरबाजी
माळनाका परिसरात लागलेलं पोस्टर

- राकेश गुडेकर, रत्नागिरी प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नारायण राणे यांच्या पॅनलने बाजी मारुन पुन्हा एकदा बँकेवर आपलं वर्चस्व मिळवलं आहे. राणेंना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीने यंदा सिंधुदुर्गात मोठं आव्हान तयार केलं होतं. परंतू १९ जागांपैकी ११ जागा जिंकत राणेंनी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. या विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राणेंनी शिवसेनेवर सडकून टीका केली.

या विजयानंतरही कोकणात राणे विरुद्ध शिवसेना यांच्यातलं शीतयुद्ध सुरुच आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रत्नागिरीत राणे समर्थकांनी पोस्टरबाजी करत शिवसेनेला डिवचलं आहे.

माळनाका परिसरात लागलेलं पोस्टर
सिंधुदुर्ग: जिल्हा बँकेची निवडणुकीत कोणी मारली बाजी कोणाचा पराभव? संपूर्ण निकाल एका क्लिकवर

रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरात राणे समर्थकांनी अभिनंदनाचं पोस्टर लावलं असून त्यावर, झुंड मे तो सुअर आते है, शेर तो अकेला आता है ! Mind it ! असा संदेश छापला आहे. त्यामुळे या पोस्टरबाजीवरुन आगामी काळात कोकणातलं राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह दिसत आहेत.

माळनाका परिसरात लागलेलं पोस्टर
राणे विरुद्ध शिवसेना वाद शिगेला : नितेश राणेंविरुद्ध मुंबईत पोस्टरबाजी, भाजपची कारवाई करण्याची मागणी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमीत्ताने गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गात तळ ठोकून होते. राणेंची साथ सोडून महाविकास आघाडीत गेलेल्या सतिश सावंत यांच्या प्रचारप्रमुखावर झालेला हल्ला, आमदार नितेश राणेंच्या अटकेसाठी झालेले प्रयत्न या सर्व घडामोडींमध्येही राणेंनी जिल्हा बँकेची सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहे. सिंधुदुर्ग कोर्टाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबईत नितेश राणेंविरुद्ध पोस्टरबाजी करण्यात आली होती. त्या पोस्टरबाजीला राणे समर्थकांनी आता कोकणात प्रत्युत्तर दिलं आहे.

माळनाका परिसरात लागलेलं पोस्टर
जिल्हा बँकेत अपयश तरीही वैभव नाईकांचा राणेंना धक्का, समर्थक राजन तेलींचा केला पराभव

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in