Corona in India: सुप्रीम कोर्टही कोरोनाच्या कचाट्यात, आतापर्यंत चार न्यायाधीश कोरोना पॉझिटिव्ह

Supreme court four judges corona positive: सुप्रीम कोर्टातील चार न्यायाधीश कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता येथील कामावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे.
supreme court four judges corona positive online hearing has now begun
supreme court four judges corona positive online hearing has now begun

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात कोरोनाने संक्रमित झालेल्या न्यायाधीशांची संख्याही तीन दिवसात दुप्पट झाली आहे. आतापर्यंत चार न्यायाधीश कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर दुसरीकडे संसद भवनही कोरोनाच्या विळख्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी हा अधिक संवेदनशील मुद्दा आहे. कारण, येथील बहुतांश न्यायाधीश हे 60 ते 64 वयोगटातील आहेत. लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोकाही अधिक असतो.

न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीचे रूपांतर हे वर्क फ्रॉम होममध्ये झालं आहे. आता सर्व न्यायाधीश त्यांच्या शासकीय निवासस्थानी बांधलेल्या न्यायालयीन कक्षात सुनावणीला उपस्थित राहत आहेत. सर्व न्यायाधीशांचे निवासस्थान आणि सर्वोच्च न्यायालयाचा परिसर पूर्णपणे सॅनिटाइझ करण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आवारात सुरक्षा कर्मचारी आणि अत्यावश्यक कर्मचार्‍यांशिवाय इतर कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश बंदी आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी गुरुवारी प्रकरणांची प्रत्यक्ष सुनावणी आठवड्यातून तीन दिवस स्थगित केली आहे.

संसद भवनात 400 हून अधिक रुग्ण

कोरोनाने संसद भवनालाही वेढले आहे. 6 आणि 7 जानेवारी रोजी संसदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची, सुरक्षा कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी 400 हून अधिक लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

महाराष्ट्रात कठोर निर्बंध

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. 1 ते 7 जानेवारी या कालावधीत रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. रात्री 11 ते सकाळी 5 या कालावधीत कर्फ्यू लावण्यात आला आहे. आणखी काय काय गाईडलाईन्स सरकारने दिल्या आहेत जाणून घेऊ. 10 जानेवारीपासून या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

supreme court four judges corona positive online hearing has now begun
...तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील - राजेश टोपेंचा तळीरामांना इशारा
 • पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र फिरता येणार नाही

 • रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही

 • लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 50 व्यक्तींना उपस्थिती

 • अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना उपस्थित राहता येणार

 • शाळा आणि महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

 • थिएटर्स, नाट्यगृहं 50 टक्के उपस्थितीची मुभा

 • सलून आणि खासगी कार्यालयं 50 टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याची मुभा

 • खासगी कार्यालयांनी वर्क फ्रॉम होम सुरू करण्यात यावं

 • पूर्ण लसीकरण झालेल्या सार्वजिनक बसने वाहतूक करण्यास मुभा

 • हॉटेल, रेस्तराँ रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा

 • स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळ पूर्णतः बंद

 • महाराष्ट्रात प्रवेश करायचा असल्यास कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र किंवा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं बंधनकारक

 • हॉटेल्स रेस्तराँमध्ये लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवेश, होम डिलिव्हरी सेवा पूर्णवेळ सुरू राहणार

 • 24 तास सुरू राहणारे कार्यालयातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडली जाणार

 • दुकानं, हॉटेल्स रेस्तराँमध्ये काम करणाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसी घेतलेल्या असणं बंधनकारक

 • लसीचे दोन डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्तराँवर कारवाई केली जाणार

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in