"ताजमहाल कुणी बांधला? आधी वाचून या" २२ खोल्या उघडण्याच्या याचिकेवरून कोर्टाने झापलं

जाणून घ्या काय म्हटलं आहे हायकोर्टाने?
"ताजमहाल कुणी बांधला? आधी वाचून या" २२ खोल्या उघडण्याच्या याचिकेवरून कोर्टाने झापलं

आग्रा या ठिकाणी असलेल्या ताजमहालातल्या २२ बंद खोल्या उघडण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ बेंचकडे आहे. या प्रकरणी जस्टिस्ट डी. के. उपाध्याय यांनी याचिकाकर्त्याला झापलं आहे. जनहित याचिका दाखल करता येते या सोयीचा गैरवापर करू नका. उद्या तुम्ही याल आणि म्हणाल की आम्हाला जजच्या चेंबरमध्ये जाण्याची संमती हवी आहे.

ताजमहालाच्या २२ खोल्या उघडण्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. जस्टिस डी. के उपाध्याय आणि जस्टिस सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. हायकोर्टाने भाजपच्या याचिकाकर्त्याला हे विचारलं आहे की ताजमहाल हा शहाजहाँन ने बांधला नाही का? ताजमहाल कुणी बनवला? ताजमहाल बांधून किती वर्षे झाली हे सांगायला आम्ही इथे आलो आहोत का? तुम्हाला जो विषय माहित नाही त्यावर संशोधन करा, वाचन करा. MA करा, PHD करा. जर एखादी संस्था तुम्हाला रिसर्च करण्यापासून अडवत असेल तर आमच्याकडे या असंही हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं आहे.

"ताजमहाल कुणी बांधला? आधी वाचून या" २२ खोल्या उघडण्याच्या याचिकेवरून कोर्टाने झापलं
ताज महालमधील 22 बंद खोल्यांमुळे का वाद निर्माण झालाय?

ताजमहालातल्या २२ खोल्या बंद आहेत ही माहिती तुम्ही कुणाकडे मागितली? आम्ही या याचिकेवर सुनावणी करणार आहोत टाळणार नाही असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. यानंतर याचिकाकर्त्याने हे म्हटलं आहे की कृपा करून मला त्या खोल्यांमध्ये जाण्याची संमती द्या. त्यावर हायकोर्ट म्हणालं की उद्या तुम्ही याल आणि म्हणाल की आम्हाला जजच्या चेंबरमध्ये जायचं आहे. जनहित याचिका दाखल करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो पण त्याचा गैरवापर कुणीही करू नका.

ताजमहल पांढऱ्या संगमरवरपासून बनवण्यात आला आहे. ताजमहाल हे भारतातील उत्तर प्रदेश मधील आग्रा ह्या शहरात यमुना नदीच्या काठावर वसलेले आहे. ताजमहाल म्हणजे सफेद रंगाची उत्कृष्ट आणि कलाकृती असलेली इमारत आहे. ही इमारत मोगल बादशाह शहाजहानने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ (1632ते 1653 दरम्यान) बांधली होती. मुमताज ही शहाजहानला त्याच्या इतर पत्नींपेक्षा प्रिय होती. आपल्या 14 व्या पुत्राला जन्म देताना तिने देहत्यागला आणि तिच्या आठवणीत ताजमहाल उभे राहिले. या इमारतीच्या बांधकामाला पूर्ण होण्यास एकूण 21 वर्षांचा कालावधी लागला. ताज महाल चे काम करण्यासाठी एकूण 20 हजार कामगार खर्ची पडले होते असंही इतिहासात सांगितलं जातं.

Related Stories

No stories found.