Tauktae Cyclone मुळे Wankhede Stadium मध्ये पडझड, साइट स्क्रिन कोसळली Photo व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: अरबी समुद्रात (Arabian Sea) तुफान वेगाने घोंघावणाऱ्या तौकताई (Tauktae Cyclone) चक्रीवादळाने महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टींवरील राज्यात हाहाकार उडवला आहे. सोमवारी रात्री उशिरा गुजरातच्या सौराष्ट्रमधील किनारी भागात हे चक्रीवादळ धडकलं. यावेळी वाऱ्याचा वेग तब्बल ताशी 150 किमीपेक्षा देखील जास्त होता.

गुजरातशिवाय या वादळाने महाराष्ट्रातही बरंच नुकसान केले आहे. या वादळामुळे मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमचं (Wankhede Stadium Mumbai) बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं असल्याचं समोर आलं आहे. वानखेडे स्टेडियममधील नॉर्थ स्टँडजवळी काही भाग आणि साइट स्क्रीन ही चक्रीवादळमुळे पूर्णपणे तुटल्याचं समजतं आहे.

वानखेडेमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चक्रीवादळामुळे वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या पडझडीचे फोटो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. वानखेडे स्टेडियमची अशी अवस्था पाहून कोणालाही पहिल्यांदा विश्वास बसणार नाही. ट्विटरवर वानखेडे स्टेडियमचे फोटो शेअर करुन लोक सतत त्यावर कमेंट करत आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात चक्रीवादळ बराच परिणाम दिसून आला. मुंबईत काल दिवसभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत होता.

महाराष्ट्र ते गुजरात Tauktae चक्रीवादळाचा कहर, पाहा या चक्रीवादळातील 15 महत्त्वाच्या घटना

ADVERTISEMENT

चक्रीवादळाने महाराष्ट्रात हाहाकार

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा कोकण विभागातील किनारपट्टीमधील गावांना बसला आहे. आतापर्यंत कोकणात झालेल्या चक्रीवादळाच्या संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. यात रायगड जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका खलाशाचा मृत्यू झाला आहे.

तर नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे दोन जणांचा झाड पडल्याने मृत्यू झाला आहे. एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदवाडी बंदरावर येथे नांगर घातलेल्या दोन बोटी बुडाल्या ज्यावर सात नाविक होते.

मुंबईत तौकताई चक्रीवादळाचं रौद्र रुप

तौकताई या चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी 100 किमी प्रति वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे मुंबईच्या नजीक असणारा समुद्र चांगलाच खवळला होता. त्यामुळे पहिल्यांदाच समुद्राचं रौद्र रुप यावेळी पाहायला मिळत होतं. या वादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची बरीच पडझड झाली. तर अनेक ठिकाणी घरांचं देखील नुकसान झालं आहे.

हवामान खात्यातील एका अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की, सोमवारी मुंबईत मुसळधार पावसासह जवळजवळ ताशी 120 किमी प्रति वेगाने वारे वाहत असल्याची देखील नोंद हवामान खात्याने केली आहे. दरम्यान, मुंबईत याबाबतचा अलर्ट आधीच जारी करण्यात आला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT