दसरा मेळाव्यात ‘तेजस ठाकरे’ करणार सीमोल्लंघन; युवा सेनेची स्वीकारणार सूत्रं?

किरण तारे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी ऑनलाईन पद्धतीने होणार नसून तो षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. हा मेळावा महत्त्वाचा आहे याचं कारणही तसंच महत्त्वाचं आहे कारण या दसरा मेळाव्यात आणखी एका ठाकरेचं लाँचिंग केलं जाण्याची शक्यता आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे राजकारण केलं त्यामध्ये आणि आत्ताचं शिवसेनेचं राजकारण यात बराच फरक पडला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीतल्या एका दसऱ्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांचं लाँचिंग करण्यात आलं होतं. आता या दसऱ्या मेळाव्यात आणखी एक ठाकरे राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याचं कळतं आहे.

या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे द्वितीय पुत्र तेजस ठाकरे यांचं अधिकृत लाँचिंग होण्याची शक्यता आहे. तेजस ठाकरे हे अद्याप राजकारणात सक्रिय नाहीत. शिवसेना नेते आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरेंच्या वाढदिवसाला दिलेली जाहिरात याचीच चुणूक दाखवणारी होती. तेजस ठाकरे हे ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस आहेत असा उल्लेख त्यांनी या जाहिरातीत केला होता. या जाहिरातीची चर्चा बरीच रंगली होती. आता थेट तेजस ठाकरेंचं राजकीय लाँचिंग होऊ शकतं आणि त्यासाठी दसरा मेळाव्याचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्ष पद देण्यात आलं तेव्हा काय झालं होतं हे सगळ्यांना ठाऊक आहे. महाराष्ट्राला ठाकरे बंधू वेगळे होण्याचा प्रसंग अद्यापही लक्षात आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेशी फारकत घेतली आणि आपला पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना लाँच केलं आणि आता यावर्षी म्हणजेच दसरा मेळाव्यात तेजस ठाकरेंना राजकीय व्यासपीठावरून लाँच केलं जाऊ शकतं. असं झाल्यास महाराष्ट्राला दोन सख्खे ठाकरे बंधू राजकारणात सक्रिय झालेले पाहण्यास मिळतील.

Tejas Thackeray हे ठाकरे कुटुंबाचे Vivian Richards, वाचा कोणत्या नेत्यानं केलं आहे कौतुक?

ADVERTISEMENT

तेजस ठाकरे काय करतात?

ADVERTISEMENT

भाऊ आदित्य ठाकरे आणि वडील उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे तेजस ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय नाहीत. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी तेजस ठाकरेंनी शिवसेनेचा प्रचार केला होता. वाईल्डलाईफ फोटोग्राफी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वन्य जिवांचा अभ्यास करत असताना खेकड्यांच्या अनेक प्रजातीही तेजस यांनी शोधल्या आहेत. यातल्या एका प्रजातीला ठाकरे कुटुंबीयांचं नाव देण्यात आलं आहे.

मागील वर्षी पालीच्या दुर्मिळ प्रजातीचाही शोध लावला होता. कर्नाटकमध्ये असलेल्या सकलेशपूरच्या जंगाल उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातीच्या पाली आढळून आल्या आहेत. तेजस ठाकरे यांच्या इंस्टापेजवरही या पालींचे आणि खेकड्यांचे फोटो आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT