'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वरील दुर्घटना! बंद पडलेल्या टेम्पोला लागली आग, एकाचा मृत्यू

टेम्पोच्या केबिनमध्ये झोपलेल्या व्यक्तीला गमावावा लागला जीव; दोन किमीपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा
'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वरील दुर्घटना! बंद पडलेल्या टेम्पोला लागली आग, एकाचा मृत्यू
मृतदेह रुग्णालयात घेऊन जाताना कर्मचारी.

मुंबई-पुण्याला जोडणारा आणि सतत वाहनांची वर्दळ असलेल्या 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर मोठी दुर्घटना घडली आहे. रस्त्यातच अचानक बंद पडलेला टेम्पो मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागून जळून खाक झाला. टेम्पोला लागलेल्या आगीच्या भडक्यात एकाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

मुबंई-पुणे एक्सप्रेस वे वर रसायनी पोलीस स्टेशन हद्दीत मुबंईहुन पुण्याकडे जाणारा आयशर टेम्पो काही कारणांमुळे बदं पडला. बंद पडलेला हा टेम्पो पेट्रोलिंग टीमने (महामार्गावर गस्त घालणारं पथक) महामार्गाच्या एका बाजूला उभा केला. त्यानंतर टेम्पोच्या ठिकाणी बँरिगेटसही लावल्या होत्या.

मृतदेह रुग्णालयात घेऊन जाताना कर्मचारी.
सातारा : हिरकणी रायडर्स ग्रूपच्या शुभांगी पवार यांचा अपघाती मृत्यू

नतंर काही वेळाने सदर टेम्पोत अचानक आगीचा भडका उडाला. या आगीमध्ये टेम्पोच्या केबिनमधील एक व्यक्तीचा म्रुत्यू झाला. टेम्पोतून मृतदेह काढून खालापुर तालुक्यातील चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

मध्यरात्रीच्या दरम्यान लागलेल्या या आगीमध्ये आयशर टेम्पो जळून खाक झाला. खोपोली अग्निशमन दल, सिडको अग्निशमन दल, रिलायन्स अग्निशमन दलाने टेम्पोला लागलेली आग नियत्रंणात आणली.

मृतदेह रुग्णालयात घेऊन जाताना कर्मचारी.
पुणे हादरलं! आठवीत शिकणाऱ्या मुलीवर कोयत्याने वार, एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचा अंदाज

'एक्स्प्रेस वे'वर दोन किमीपर्यंत लागल्या रांगा

टेम्पोला आग लागून झालेल्या दुर्घटनेचा परिणाम मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वरील वाहतुकीवर झाला. यादरम्यान मुबंईहुन पुण्याकडे जाणारी वाहतुक रोखून धरण्यात आल्याने २ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. देवदुत टिम, आय. आर. बी. यत्रंणा, डेल्टा फोर्स, वाहतूक पोलीस पळस्पे, रसायनी पोलीस स्टेशन, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक यत्रंणाच्या टिम सदस्यांनी दोन तासाच्या प्रयत्नानतंर आगीवर नियत्रंण मिळवून वाहतूक पुन्हा सुरळीत केली.

Related Stories

No stories found.