TET Scam : पैसे देऊन शिक्षक झालेल्यांच्या नोकऱ्या जाणार?; ७,८८० जणांची यादी तयार

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आरोग्य विभागातील भरती परीक्षेतील घोटाळ्यामुळे उघडकीस आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात पुणे पोलिसांनी अपात्र असून, नोकरी मिळवलेल्या ७,८८० जणांची यादी तयार केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुणे पोलीस, सायबर विभाग टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्याचा तपास करत आहे. यात अनेकजणांना अटक केलेली असून, आता पैसे देऊन नोकरी मिळवणाऱ्या अपात्र उमेदवारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. पुणे साइबर विभागाच्या प्रमुख डीसीपी भाग्यश्री नवटक्के यांनी ‘मुंबई Tak’शी बोलताना ही माहिती दिली.

गेल्या वर्षाच्या अखेरीस राज्यात आरोग्य विभाग, म्हाडाच्या भरती परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणांचा तपास करत असतानाच पोलिसांना २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे धोगदोरे मिळाले. परीक्षेत नापास झालेल्या उमेदवारांची नावं पैसे घेऊन पात्रता यादीत घुसवण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं होतं.

या प्रकरणात पोलिसांनी मोठ्या अधिकाऱ्यांसह परीक्षा आयोजित करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही अटक केलेली आहे. आता पोलिसांनी ज्या उमेदवारांना पैसे घेऊन पात्र ठरवण्यात आलं आहे. त्यांची यादी तयार केली आहे. २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत ७,८८० बोगस शिक्षकांची भरती करण्यात आलेली असून, त्यांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. पुणे साइबर विभागाने ही यादी तयार केली असून, पुढील काही दिवसांत ती राज्य शिक्षण विभागाकडे सोपवली जाणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यानंतर शिक्षण विभाग बोगस शिक्षकांपैकी किती जण कार्यरत आहे. त्यांची माहिती घेऊन चौकशी करणार असल्याचं समजतं. त्यामुळे अपात्र असतानाही गैरमार्गाचा अवलंब करून नोकरी मिळवणाऱ्या या शिक्षकांवर शिक्षण विभागाकडून कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.

२०१८ आणि २०२० मधील बोगस शिक्षकांचीही यादी तयार केली जाणार…

ADVERTISEMENT

पुणे पोलिसांना या तपास २०१८ व २०२०मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचं आढळून आलं आहे. २०१८ आणि २०२० मध्ये झालेल्या परीक्षेत अपात्र उमेदवारांची नावं समाविष्ट केलेली असून, २०१८ मध्ये १,५०० अपात्र उमेदवारांना पात्र ठरवण्यात आलेलं आहे. या बोगस शिक्षकांची यादीही पोलिसांकडून तयार केली जात आहे. त्यानंतर २०२० मधील बोगस उमेदवारांची यादी तयार केली जाणार असल्याची माहिती पुणे साइबर विभागाच्या प्रमुख डीसीपी भाग्यश्री नवटक्के यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT