12 दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू, संप चिघळल्याने प्रवाशांचे अतोनात हाल

12 दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू, संप चिघळल्याने प्रवाशांचे अतोनात हाल

राज्य परिवहन महामंडळाचे शासनाकडे विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या 12 दिवसापासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे प्रवासी सेवा ठप्प झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये बस बंद असल्याने प्रवासी वाहतूक ठप्प झाली आणि परिणामी एसटीलाही कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

लातूर जिल्ह्यात औसा, उदगीर, निलंगा, लातूर आणि अहमदपूर अशी एकूण पाच आगारं आहेत. 28 ऑक्टोबर पासून हा संप चालू आहे दरम्यान उच्च न्यायालयाने हा संप बेकायदेशीर आहे असं सांगितले होते आंदोलकांनी कामावर यावे असा आदेश दिला होता विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील पाचही आगारांना भेट देऊन कामावर रुजू होण्यासाठी मोठे प्रयत्न केले पण आंदोलक कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

आज लातूर जिल्ह्यातील आंदोलनाचा बारावा दिवस आहे करो या मरो अश्या मानसिकतेत आंदोलक दिसून येत आहेत. शासन आंदोलकाच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने जिल्ह्यात निलंगा औसा आणि उदगीर या ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला होता सुदैवाने जीवितहानी झाली नाही

संप काळात साडेपाच कोटीचा एसटीला फटका

लातूर जिल्ह्यात लातूर उदगीर औसा अहमदपूर आणि निलंगा अहमदपूर असे पाच आगार आहेत या पाचही आजारांपैकी लातूरकरांचे दैनंदिन उत्पन्न 12 ते 13 लाख आहे त्या खालोखाल उदगीर 11 लाख निलंगा 09 लाख औसा सात ते आठ लाख आणि अहमदपूर 07ते 08 लाखांच्या आसपास दैनंदिन उत्पन्न मिळते मात्र गेल्या दहा दिवसांपासूनदररोज एसटीला 40 ते 50 लाखांचे उत्पन्न मिळते पाच हजारांचे मिळून हे दररोजचे उत्पन्न आहे मागील दहा बारा दिवसाच्या संप काळात साडेपाच कोटी चे नुकसान लातूर जिल्ह्याला झाले आहे तरी संप मिटला नाही

संप काळात प्रवाशांचे हाल

शिवाय प्रवाशांचे हाल होत आहेत ज्यांच्याकडे वाहनांची सुविधा नाही त्यांना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांद्वारे जाण्याशिवाय पर्याय नाही मात्र खिशाला चाट बसत आहे हे मात्र संप कधी मिटेल अशी प्रतिक्रिया प्रवाश्यांनी दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरात काय पडले....

महाराष्ट्र शासनाने विलगीकरण ची मागणी वगळता कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यां मंजूर केल्याचे समजते संबंधित संघटनांनी याबाबत संप सुद्धा मागे घेतल्याचे जाहीर केले होते मात्र एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एकमत न झाल्याने संप सुरू आहेत.

आंदोलनकर्त्यांनी ठाम भूमिका

जो पर्यंत महामंडळाचे विलगीकरण राज्य शासना मध्ये होणार नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही केलेला संप मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांकडून होत आहे करो या मरो या भूमिकेमध्ये सध्या तरी आंदोलनकर्ते पाहायला मिळतात.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in