सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यातील असे वाद ज्याने कॉर्पोरेट जगताला हादरवले - Mumbai Tak - the controversy between cyrus mistry and ratan tata - MumbaiTAK
बातम्या

सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यातील असे वाद ज्याने कॉर्पोरेट जगताला हादरवले

कॉर्पोरेट जगतातील भांडणाबद्दल बोलायचे झाले तर सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यातील वाद हा सर्वात मोठा होता. वर्षानुवर्षे त्यांच्यात वाद सुरूच होते. या दोघांमधील अंतर्गत भांडणं हा इतिहासातील सर्वात मोठा वाद मानला जातो. लाखो प्रयत्न करूनही दोघांच्या वादामध्ये तोडगा निघू शकला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा समूहानं निवडणुकीला देणगी कशी द्यायची, कोणत्या प्रकल्पात गुंतवणूक कशी करायची, […]

कॉर्पोरेट जगतातील भांडणाबद्दल बोलायचे झाले तर सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यातील वाद हा सर्वात मोठा होता. वर्षानुवर्षे त्यांच्यात वाद सुरूच होते. या दोघांमधील अंतर्गत भांडणं हा इतिहासातील सर्वात मोठा वाद मानला जातो. लाखो प्रयत्न करूनही दोघांच्या वादामध्ये तोडगा निघू शकला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा समूहानं निवडणुकीला देणगी कशी द्यायची, कोणत्या प्रकल्पात गुंतवणूक कशी करायची, टाटा समूहाने अमेरिकन फास्ट फूड चेनमध्ये सामील व्हावे की नाही अशा मुद्द्यांवरून दोघांमध्ये वाद झाला होता. या गोष्टींवरून वाद वाढत गेला आणि परिस्थिती इतकी बिघडली की हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.

पालोनजी मिस्त्री यांचे पुत्र सायरस मिस्त्री यांना 2012 मध्ये टाटा सन्स समूहाचे अध्यक्ष बनवण्यात आले. रतन टाटा यांना बाजूला करुन त्यांना या पदावर बसवण्यात आले. मात्र, 2016 मध्ये मिस्त्री यांना अचानक अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. तेव्हापासून त्यांचा टाटा समूहाशी दुरावा सुरू होता. टाटा समूहाने मिस्त्री यांच्या मालकीच्या एसपी ग्रुपचे शेअर्स विकत घेण्याची आणि टाटा सन्समध्ये विलीन करण्याची ऑफर दिली होती, परंतु मिस्त्री कुटुंबाने ते स्वीकारले नाही. अखेर हे प्रकरण न्यायालयात गेले जेथे रतन टाटा यांच्या बाजूने निकाल लागला.

ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या वेळी झाला होता वाद

ज्या मुद्द्यांवरून वाद निर्माण झाला होता त्यातला एक मुद्दा म्हणजे देणग्यांचा मुद्दा. मोठमोठी कॉर्पोरेट हाऊसेस राजकीय देणग्या देतात आणि ही सुरुवातीपासूनची प्रथा आहे. टाटा सन्सचीही तीच स्थिती आहे. ओडिशातील देणगी प्रकरणावरून मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात मतभेद झाले होते. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की सायरस मिस्त्री यांच्या जवळच्या सहाय्यकाने 2014 च्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत 10 कोटी रुपयांची देणगी देण्याचा अभिप्राय दिला होता. मिस्त्री गटाचे मत होते की ओडिशात भरपूर लोह आहे ज्याचा फायदा घेतला जाऊ शकतो. पण रतन टाटा यांच्या मंडळाने या मताच्या विरोधात जाऊन आपला मुद्दा ठेवला.

टाटा-वेलस्पन डीलचे प्रकरण

दुसरा वाद टाटा-वेलस्पन कराराचा होता. टाटा-वेलस्पन डील सायरस मिस्त्री यांनी केल्याचे सांगितले जाते, मात्र ही माहिती टाटा सन्सच्या बोर्डाला देण्यात आलेली नव्हती. टाटा सन्सच्या बोर्डाने याला कॉर्पोरेट नियमांचे उल्लंघन म्हटले आहे. कारण हा करार इतका मोठा होता की बोर्डाला कळवल्याशिवाय तो पुढे नेणे शक्य नव्हते. पण सायरस मिस्त्रींनी तसे केले नाही. यावरूनही सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यातील मतभेद वाढले. मुख्य म्हणजे टाटा सन्सला वेलस्पन डीलची माहिती मिळण्यापूर्वीच ही बातमी मीडियापर्यंत पोहोचली. याबाबत टाटा सन्सने नाराजी व्यक्त केली. नंतर मधला मार्ग काढून समेट घडवून आणली.

अमेरिकन कंपनीवरुनही झाला होता वाद

पुढचा वाद टाटा कंपनीने अमेरिकन फास्ट फूड कंपनी लिटिल सीझर्सशी केलेल्या कराराचा होता. सायरस मिस्त्री यांच्या नेतृत्वाखालील मंडळाने अमेरिकन फास्ट फूड कंपनीशी करार करण्याची योजना आखली होती, परंतु हे प्रकरण टाटा सन्सच्या बोर्डासमोर ठेवण्यात आले नाही. टाटा सन्सने सांगितले की त्यांच्या इतर कोणत्याही कंपनीने अशा प्रकारचा निर्णय घेतला असता. टाटा सन्सने असेही म्हटले आहे की, अशा मतभेदांमुळे कंपनीची प्रतिमा डागाळत आहे. मिस्त्री यांच्या सहकाऱ्यांनी असा युक्तिवाद केला की टाटा समूह आधीच स्टारबक्स या कॉफी चेनमध्ये सामील झाला असल्याने, फास्ट फूड कंपनीसोबतच्या व्यावसायिक करारात काहीही चूक नाही. टाटा आणि डोकोमो यांच्यातही असाच वाद होता जो नंतर दिल्ली उच्च न्यायालयात गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four − three =

Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी! ‘ही’ 5 पानं आहेत दीर्घायुष्याचं वरदान! अल्लू अर्जुनने केलं मतदान, ज्युनियर NTR ने लावली रांग; तेलंगणा मतदानात स्टार पॉवर!