"वीर सावरकर आणि आकाशवाणीवरून निर्माण झालेला वाद हे अतिशय गलिच्छ राजकारण"

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी मुंबई तकशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे
"वीर सावरकर आणि आकाशवाणीवरून निर्माण झालेला वाद हे अतिशय गलिच्छ राजकारण"

वीर सावरकर आणि आकाशवाणीवरून सुरू झालेला वाद हे अत्यंत गलिच्छ राजकारण आहे अशी टीका पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केली आहे. या वादाला मी काडीचंही महत्त्व देत नाही. मी जी मुलाखत दिली त्यात नोकरी हा शब्द चुकला असेल पण तेव्हा काँट्रॅक्ट करूनच कलाकाराला आकाशवाणीवर रूजू करत होते. मी जे वृत्तवाहिनीवर बोललो तेच बरोबर आहे. ज्याला ते असत्य ठरवायचं असेल त्याने खुशाल ठरवा मी फिकीर करत नाही असंही हृदयनाथ मंगेशकर यांनी म्हटलं आहे.

"वीर सावरकर आणि आकाशवाणीवरून निर्माण झालेला वाद हे अतिशय गलिच्छ राजकारण"
"सावरकर मला म्हणाले, 'फक्त लोकांच्या नकलाच करू नकोस"; बाबासाहेबांनी सांगितलेला किस्सा

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना वीर सावरकर यांचं ने मजसी ने परत मातृभूमीला हे गाणं संगीतबद्ध केल्याने त्यांना आकाशवाणीतून काढून टाकण्यात आलं होतं. हा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केला होता आणि त्यावरून बराच वादंग निर्माण झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करत हा उल्लेख केला होता. तसंच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हृदयनाथ मंगेशकर यांनी हे सांगितल्याचं उदाहरणही दिलं होतं. मात्र आज या सगळ्या विषयावर भाष्य करण्यास हृदयनाथ मंगेशकर यांनी नकार दिला आहे.

काय आहे प्रकरण?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी असा दावा केला होता की 'ने मजसी ने परत मातृभूमिला' ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता मी आकाशवाणीवर ध्वनीमुद्रीत केली आणि त्यामुळे मला आकाशवाणीने आधी कारणे दाखवा नोटीस दाखवली. त्यानंतर ८ दिवसांतच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच गोष्टीचा आधार घेत राज्यसभेत भाषण करताना काँग्रेसला सणसणीत चिमटे काढले.

"वीर सावरकर आणि आकाशवाणीवरून निर्माण झालेला वाद हे अतिशय गलिच्छ राजकारण"
काँग्रेसची सत्ता असताना आकाशवाणी, दूरदर्शनने वीर सावरकरांच्या कार्यक्रमांवर बंदी आणली होती का?

या सगळ्यानंतर पत्रकार आणि स्तंभलेखक राजू परूळेकर यांनी काही ट्विट करत हृदयनाथ मंगेशकर खोटं बोलले असा दावा केला होता. हृदयनाथ मंगेशकर यांनी आकाशवाणीवर नोकरी केली होती असं त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत साफ खोटं सांगितलं. इतकंच नाही तर वीर सावरकर यांची गीतं गोळवलकर नावाचे प्रोड्युसर पुणे आकाशवाणीत नोकरीला होती. त्यांनी त्यांनी संगीत देऊन आयुष्यभर आकाशवाणीवर वाजवलेली आहेत.

has hridaynath mangeshkar really been fired from all india radio know Is the claim made by pm modi true
has hridaynath mangeshkar really been fired from all india radio know Is the claim made by pm modi true

लहानपणापासून आपण अनेकदा सावरकरांची गीतं आकाशवाणी, दूरदर्शनवर ऐकत आलेलो आहोत. इंदिरा गांधी यांनी सावरकरांवर पोस्टल तिकिट काढलं होतं. काँग्रेसने विरोधकांना सन्मानाने वागवलं आहे. मोदीजी आणि मंगेशकर धादांत खोटं बोलत आहेत असा दावा राजू परूळेकर यांनी केला होता.

याबद्दल बोलताना ज्येष्ठ कवी आणि आकाशवाणीवर बरीच वर्ष काम करणाऱ्या महेश केळुसकरांनीही ही गोष्ट स्पष्ट केली आहे की काँग्रेस सत्तेवर असताना अनेकवेळा आकाशवाणीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांची भाषणं, त्यांच्या कविता, गाणी यावरती खूपवेळा कार्यक्रम प्रसारित झाले आहेत असं त्यांनी मुंबई तकला सांगितलं होतं. आता या सगळ्यावर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी भाष्य करत या वादाला मी काडीचंही महत्त्व देत नाही असं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in