Avinash Bhosle यांना ED चा दणका, पुण्यातील 4 कोटींची मालमत्ता जप्त

Avinash Bhosle यांना ED चा दणका, पुण्यातील 4 कोटींची मालमत्ता जप्त

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना ईडीने दणका दिला आहे. त्यांची चार कोटी रूपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीची जागा ईडीने जप्त केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित हे ईडीच्या रडारवर आहेत. गेल्या महिन्यात अविनाश भोसले यांनी पाच तास चौकशी जाली होती. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित या दोघांनाही ईडीने समन्स पाठवलं होतं. पुणे येथील एका जमिनीवर अविनाश भोसले यांनी एक बांधकाम केलं आहे. ही जमीन सरकारी होती. याबाबत पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसले यांची पुण्यातील कोरेगाव पार्क भागात हॉटेल वेस्टीन, गोव्यात हॉटेल डब्ल्यू रिट्रिट अँड स्पा, नागपूरमध्ये हॉटेल ल मेरेडियन ही तारांकित हॉटेल्स आहेत. दुबईतील रोशडेल असोसिएट्स लिमिटेड या कंपनीत भोसले कुटुंबीयांची गुंतवणूक आहे. परदेशातील बँकांमध्ये खाती आहेत. परकीय चलन व्यवहारात नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे ईडीकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान, ईडीने भोसले यांच्या गणेशखिंड रस्त्यावरील कार्यालयातही काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती.

बिल्डर अविनाश भोसले यांच्या विरोधात पुणे येथील जमीन व्यवहाराबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ईडीने मनी लाँडरींग प्रकरणी तपास सुरू केला आहे. या आधी ईडीने 11 फेब्रुवारीला अविनाश भोसले यांच्याशी संबंधित चार ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यावेळी अविनाश भोसले आणि मुलगा अमित भोसले यांना ताब्यात घेऊन ईडीने चार तास चौकशीही केली होती. या नंतर 12 तारखेला अविनाश भोसले आणि अमित भोसले या दोघांची पुन्हा चौकशी झाली होती.

कोण आहेत अविनाश भोसले?

एक रिक्षावाला ते रिअल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे

अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत

कोट्यवधी रूपयांच्या ABIL ग्रुपचे ते मालक आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in