Cruise Drug Party प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौघांना 11 ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी

Cruise Drug Party प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौघांना 11 ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी

Cruise Drug Party प्रकरणात आज अटक करण्यात आलेल्या चार जणांना 11 ऑक्टोबरपर्यंत NCB च्या कोठडीत धाडण्यात आलं आहे. अब्दुल कादिर शेख, श्रेयस नायर, मनिष दरिया आणि एविन साहू अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावं आहे. या चौघांनाही आज सकाळी अटक करण्यात आली आहे.

Cruise Drug Party प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौघांना 11 ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी
Cruise Drugs Party: पाहा 'त्या' क्रूझवर NCB ला काय-काय सापडलं!

मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर 2 ऑक्टोबर रोजी धाड टाकली होती. या कारवाईत एनसीबीने आठ जणांना अटक केली होती. तर काही जणांना ताब्यात घेतलं होतं.

या प्रकरणात आता आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या पथकाने सोमवारी ही कारवाई केली. यातील एकाला क्रूझवरील कारवाईवेळी ताब्यात घेण्यात आलं होतं. तर दुसरा आरोपी ड्रग्ज पेडलर असून त्याला जोगेश्वर परिसरातून अटक करण्यात आली आहे.

एनसीबीने जोगेश्वरी परिसरात धाड टाकली होती. यावेळी ड्रग्ज पेडलरला अटक करण्यात आली. त्याच्याजवळ मेफेड्रोन ड्रग्ज सापडले. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या दोघांना आज (5 ऑक्टोबर) न्यायालयापुढे हजर केलं जाणार आहे.

aryan khan drugs party  ncb see that luxurious cruise pics
aryan khan drugs party ncb see that luxurious cruise pics

एनसीबीने वैद्यकीय चाचणीनंतर आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना न्यायालयासमोर हजर केलं होतं. त्यांना सुरुवातीला 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली होती. त्यानंतर सोमवारी तिघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने तिन्ही आऱोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

एनसीबीने रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केल्यानंतर आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. चौकशी आणि वैद्यकीय चाचणी केल्यानंतर एनसीबीने आठ जणांवर अटकेची कारवाई केली. आता आज आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.