Covid 19 : दिलासा! मुंबईत दिवसभरात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा जास्त

मुंबईत दिवसभरात सहा मृत्यूंची नोंद
Covid 19 : दिलासा! मुंबईत दिवसभरात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा जास्त
(फोटो सौजन्य: Jaison G)

मुंबईसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत आज पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. मुंबईत दिवसभरात 13 हजार 702 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर 20 हजार 849 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 88 टक्के झाला आहे. तर डबलिंग रेट 36 दिवसांवर गेला आहे.

मुंबईचा 6 जानेवारी ते 12 जानेवारी या आठवड्यातला रूग्णवाढीचा दर 1.85 टक्के इतका नोंदवला गेला आहे. मुंबईत आज दिवसभरात पाच रूग्णांची नोंद झाली आहे. या पाच रूग्णांपैकी 1 रूग्ण महिला होती तर पाच रूग्ण पुरूष होते. या सगळ्या रूग्णांचं वय 60 वर्षे आणि त्यावरच्या वयाचे होते. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 16426 मृत्यू झाले आहेत. आज दिवसभरात मुंबईत 63 हजार 31 चाचण्या झाल्या, त्यापैकी 13 हजार 702 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

Covid 19 : दिलासा! मुंबईत दिवसभरात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा जास्त
'मुंबईतील कोरोना रूग्णसंख्या आणि मृत्यूंची बनवाबनवी थांबवा,जनतेची दिशाभूल नको'

आज 13 हजार 702 रूग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी 871 रूग्णांना रूग्णालयात दाखल कऱम्यात आलं आहे. मुंबईल्या विविध रूग्णालयं आणि कोव्हिड सेंटरमध्ये जे बेड आहेत ते आज घडीला 17.3 टक्के भरले आहेत. मुंबईतल्या झोपडपट्टी आणि चाळी यामधल्या कंटेन्मेंट झोनची संख्या 0 झाली आहे. तर 61 इमारती सील करण्यात आल्या आहेत.

Covid 19 : दिलासा! मुंबईत दिवसभरात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा जास्त
लहान मुलांसाठी डेल्टापेक्षा जास्त घातक ठरू शकतो ओमिक्रॉन, काय म्हणत आहेत तज्ज्ञ?

मुंबईत कसे वाढत गेले रूग्ण पाहा

24 डिसेंबर 683

25 डिसेंबर 757

26 डिसेंबर 922

27 डिसेंबर 809

28 डिसेंबर 1377

29 डिसेंबर 2510

30 डिसेंबर 3671

1 जानेवारी 6347

2 जानेवारी 8063

3 जानेवारी 8082

4 जानेवारी 10860

5 जानेवारी 15166

6 जानेवारी 20181

7 जानेवारी 20971

8 जानेवारी 20,318

9 जानेवारी 19474

10 जानेवारी 13,648

11 जानेवारी 11,647

12 जानेवारी 16,420

Covid 19 : दिलासा! मुंबईत दिवसभरात बरे झालेल्या रूग्णांची संख्या पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा जास्त
ओमिक्रॉन बाधितांची संख्या फेब्रुवारीत पोहोचणार उच्चांकांवर; आयआयटीतील प्राध्यापकाचा दावा

मुंबईत मागच्या दोन आठवड्यात रूग्णसंख्या वाढते आहे. सातत्याने रूग्ण वाढत असले तरीही मुंबईत लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही. तसंच राज्यातही लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही. पॉझिटिव्ह येणाऱ्या रूग्णांची संख्या जास्त असली तरीही यामधले अनेक रूग्ण हे लक्षणं नसलेले आहेत. तसंच ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रभाव हा डेल्टा इतका घातक नाही असंही सांगितलं जातं आहे. मात्र ऑक्सिजनचा वापर आणि बेड जास्त प्रमाणात भरले तर मुंबई आणि राज्याबाबत कठोर निर्णय घेतला जाईल असंही सांगण्यात आलं आहे. तूर्तास काही निर्बंध आहेत मात्र पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in