Corona Delta+ व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात अद्याप एकही मृत्यू नाही, राजेश टोपे यांची माहिती

महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रूग्ण आढळले आहेत, त्यामधले बहुतांश बरे झाले आहेत
Corona Delta+ व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात अद्याप एकही मृत्यू नाही, राजेश टोपे यांची माहिती

कोरोनाचा Delta+ व्हेरिएंट महाराष्ट्राच्या सात जिल्ह्यांमध्ये सापडला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत याचे 21 रूग्ण आढळले आहेत. प्रत्येक आठवड्यात आपण नमुने गोळा करत आहोत. आत्तापर्यंत जी साडेतीन हजारांपेक्षा जास्त सॅम्पल्स तपासण्यात आली त्यामध्ये 21 रूग्ण डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आढळले आहेत. या सगळ्या इंडेक्स केसेसमध्ये त्या रूग्णांना आयोसेलेट करण्यात येतं आहे. त्यांची पूर्ण माहिती जसं की त्यांची प्रवासाची माहिती, त्या रूग्णांनी व्हॅक्सिन घेतलं होतं का? त्या व्यक्तीला कोरोना पुन्हा झाला आहे का? याची माहिती घेतली जाते आहे. या 21 जणांचे हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट्स यांचाही अभ्यास होतो आहे. याबाबतीत एक नक्की आहे की आत्तापर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. यातले बरेचसे रूग्ण बरे झाले आहेत आणि घरीही गेले आहेत. या संदर्भात राज्य शासनाच्या वतीने केंद्र सरकारने जी माहिती मागवली आहे ती माहिती संकलित करून माहिती पाठवण्याची व्यवस्था करत आहोत.

डेल्टा प्लसच्या अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या आत्ता सांगता येणार नाही. मात्र यामध्ये मृत्यू झालेला नाही हे मात्र खात्रीपूर्वक माहिती आहे. रत्नागिरी ९, जळगाव-७, मुंबई-२ पालघर-१, सिंधुदुर्ग-१, ठाणे-१ असे हे 21 रूग्ण आहेत. डेल्टा प्लसचे वेगळे कोणतीही लक्षणं नाहीत ती डेल्टासारखीच लक्षणं आहेत. तर उपचार पद्धतीही सारखीच आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. आजपर्यंत जे 21 रूग्ण आढळले आहेत त्यापैकी एकही लहान मूल नाही. यासंदर्भात NCDC शी आमची चर्चा सुरू आहे. सर्वतोपरी काळजी घेण्याचं काम आम्ही करतो आहोत असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

Corona Delta+ व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात अद्याप एकही मृत्यू नाही, राजेश टोपे यांची माहिती
महाराष्ट्रातले 15 जिल्हे, कोरोना रूग्ण बरे होण्याबाबत ठरत आहेत आशेचा किरण

महाराष्ट्रात या व्हेरिएंटचे रूग्ण आढळले असले तरीही सध्या चिंतेचा विषय नाही. आम्ही या व्हेरिएंटच्या लक्षणांबाबत आणि उपचारांबाबत माहिती घेत आहोत. कोरोनाच्या स्थितीमध्ये आता एक बाब समाधानाची आहे की दिवसाला सरासरी 8 ते 9 हजारांमध्ये रूग्ण रोज आढळत आहे. आपण 65 हजार रूग्ण प्रति दिवस यावरून आता इथवर पोहचलो आहोत. मात्र हे प्रमाण आणखी कमी कसं करता येईल यावर आम्ही लक्ष केंद्रीत करतो आहोत. महाराष्ट्रातले पाच सहा जिल्हे असे आहेत जिथे कोरोनाची स्थिती वेगळी आहे.

त्या ठिकाणी लेव्हल थ्री, लेव्हल फोरमधे काही जिल्हे आहेत. तिथे आपण निर्बंध पाळले जावेत याची काळजी आपण घेत आहोत. आशा वर्कर्सचा जो संप सुरू होता तो आता मिटला आहे. आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. आशा वर्कर्सना आठ हजार रूपये प्रति महिना मिळत होते. यामध्ये आपण पंधराशे रूपयांची वाढ केली आहे अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in