पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण, देहूत उपस्थिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते १४ जून रोजी देहूतल्या तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण केलं जाणार आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जगद्गुरू तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकर्पण केलं जाणार आहे.

काय म्हटलं आहे तुषार भोसले यांनी?

महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक क्षण इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहु येथे येणार आहेत. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी दि. १४ जून रोजी करणार जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण ! ॥ जय जय रामकृष्णहरि ॥

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तुषार भोसले यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहु येथे येणार आहेत. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी १४ जून रोजी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहेत.

ज्ञानोबा-तुकाराम…! पंतप्रधान मोदी बनले वारकरी, पण कारण काय?

ADVERTISEMENT

संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण माझ्या हस्ते झाले ते हे माझ्या भाग्यच समजेन, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी देहूत येण्याला होकार दिल्याची विश्वस्थांनी माहिती दिली आहे. प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती असताना या शिळा मंदिराची पायाभरणी झाली होती. तेव्हापासून सुरु असलेल्या कामाला कोरोना काळात चांगली गती मिळाली. हे मंदिर संपूर्ण दगडात कोरीव काम करून उभारलेले आहे. जे आता पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पणासाठी प्रतीक्षेत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT