पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘नौटंकी’मुळे देशात Corona ची दुसरी लाट- राहुल गांधी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या लाटेबाबत मोदी सरकारला आम्ही सावध केलं होतं. मात्र तेव्हा आमची खिल्ली उडवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण कोरोनावर विजय मिळवला आहे अशी घोषणा करून टाकली. अनेकदा नौटंकी केली त्यामुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आली अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं हे सगळे तात्पुरते उपाय आहेत. मुख्य कवच आहे ते म्हणजे लसीकरण मात्र त्याकडेही केंद्र सरकारचं दुर्लक्ष झालं आहे असाही आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी झूम मिटिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली.

Corona काळात महाराष्ट्राला मिळालेल्या 2 कोटी लसी जमिनीतून उगवल्या का? -फडणवीस

मोदी सरकारने व्हॅक्सिन डिप्लोमसी केली, त्याचा परिणाम असा झाला की देशात फक्त 3 टक्के लोकांना व्हॅक्सिन्स मिळाली आहेत. म्हणजे उर्वरित 97 टक्के लोकांना कोरोना होऊ शकतो. पहिल्या लाटेच्या वेळी आपल्याकडे लस नव्हती. मात्र दुसऱ्या लाटेच्या आधी लस उपलब्ध होती. त्या लसी बाहेर पाठवण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी नौटंकी करत राहिले आणि त्यांच्यामुळेच कोरोनाची दुसरी लाट आली असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. कोरोनाचं गांभीर्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षातच घेतलं नाही. भारतात जो मृत्यूदर सांगण्यात येतो आहे तोदेखील खोटा आहे मोदी सरकारने सत्य जनतेसमोर आणावं असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मोदी सरकारची व्हॅक्सिन डिप्लोमसी फसली का?

भारतात लसीकरणाचा वेग वाढवणं हे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरणचा वेग जर वाढला नाही तर देशात तिसरी, चौथी कितीही लाटा येऊ शकतात असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. कोरोना चा विषाणू हा सतत बदल होणारा विषाणू आहे. त्याला जितका वेळ दिला जाईल तेवढा तो भयंकर होत जाईल. त्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे लसीकरण. जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे. लसीकरण आत्ता ज्या वेगाने सुरू आहे तोच वेग राहिला तर सगळ्या देशाचं लसीकरण पूर्ण व्हायला 2024 उजाडेल. तोपर्यंत कोरोनाचं रूप आणखी भयंकर झालं असलं तर लसींचा काही उपयोग होणार नाही असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

भारत हे व्हॅक्सिन कॅपिटल आहे तरीही देशातल्या लसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्यात केल्या. इथल्या लोकांना त्यांनी सपशेल वाऱ्यावर सोडलं. आता पंतप्रधानांनी व्हॅक्सिन स्ट्रॅटेजी तयार केली पाहिजे आणि इथल्या लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. असं केलं नाही तर देशात तिसरी, चौथी कितीही लाटा येऊ शकतात असाही इशारा राहुल गांधी यांनी दिला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT