'कोरोनाची तिसरी लाट नक्की येणार' जाणून घ्या हे वक्तव्य कुणी आणि का केलं आहे?

'कोरोनाची तिसरी लाट नक्की येणार' जाणून घ्या हे वक्तव्य कुणी आणि का केलं आहे?

डॉ. महेश शर्मा यांनी आज तक आणि इंडिया टुडेच्या कार्यक्रमात हे वक्तव्य केलं आहे

आपला देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरतो आहे. पहिली लाट गेली त्यावेळी असं अनेकांना वाटलं नव्हतं की दुसरी लाट येईल. मात्र दुसरी लाट कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर होती हे सगळ्या देशानं पाहिलं. दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच चर्चा सुरू झाली ती कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची. कोरोनाची तिसरी लाट येणार, लहान मुलांमध्ये त्या लाटेचा प्रभाव जास्त असणार असे काही अंदाजही वर्तवले गेले. सध्याची परिस्थिती पाहता तिसरी लाट येईल की नाही याबाबतही विविध मतंमतांतरं आहेत. अशात डॉक्टर महेश शर्मा यांनी हे म्हटलं आहे देशात कोरोनाची तिसरी लाट नक्की येणार.

डॉ. महेश शर्मा यांनी आजतकच्या इंडिया टुडे ग्रुप हेल्थगिरी अवॉर्ड्स या कार्यक्रमात हे वक्तव्य केलं आहे. गेल्या वर्षी हा कार्यक्रम व्हर्चुअल स्वरूपात झाला होता. मात्र यावेळी दिल्लीत कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळून हा कार्यक्रम होतो आहे. याच कार्यक्रमात डॉ. महेश शर्मा यांनी कोरोनाची तिसरी लाट येणार हे नक्की आहे असं म्हटलं आहे.

कोरोना रूग्ण
कोरोना रूग्ण ICMR

काय म्हणाले आहेत महेश शर्मा?

कोरोनाची तिसरी लाट नक्की येणार. या लाटेचा कालावधी हा आम्ही ऑक्टोबर, डिसेंबर असा असेल. मी देशातला पहिला खासदार होतो ज्याने कोरोना प्रतिबंधाची लस घेतली. त्यावेळी 28 दिवसांनी दुसरा डोस घेतला. मी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन महिन्यांनी मला कोरोना झाला. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात बुस्टर डोस लावले गेले पाहिजेत. कारण त्या कालावधीत लोकांची प्रतिकारशक्ती कमी होण्याची चिन्हं जास्त आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेबाबत काय म्हणाले डॉ. महेश शर्मा?

कोरोनाची पहिली लाट जेव्हा आली तेव्हा आपल्याला या आजाराबाबत फारशी माहिती नव्हती. त्यानंतर पहिली लाट ओसरली. दुसरी लाट येईल असं त्यावेळी वाटलं नव्हतं. दुसऱ्या लाटेसाठी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, प्रशासन तयार नव्हतं ही वस्तुस्थिती आहे. तयारी झाली असती तर रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजन यांचा अभाव भासला नसता ही बाब स्वीकारली पाहिजे.

'कोरोनाची तिसरी लाट नक्की येणार' जाणून घ्या हे वक्तव्य कुणी आणि का केलं आहे?
Corona Third Wave : तिसरी लाट कधी येणार? किती घातक असेल? BHU च्या वैज्ञानिकाची माहिती

मात्र सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन डॅमेज कंट्रोल केलं. आता तिसरी लाट येणार आणि ती येऊ नये अशी आपली इच्छा असली तरीही ती येणार कारण व्हायरस त्याचं रूप बदलतो. व्हायरसमध्ये म्युटेशन होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

दुसरी लाट आली त्याच वेळी तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली. त्यामुळे आपण आधीच्या अनुभवांमधून धडा घेत तिसऱ्या लाटेसोबत दोन हात करण्याची तयारी केली आहे. 130 कोटी भारतीयांची मानसिक तयारी झाली आहे, तसंच शारिरीक दृष्ट्या कोरोनाला तोंड देण्यासाठीही ते तयार आहेत असंही भाजप खासदार डॉ. महेश शर्मा यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in