CM शिंदेंविरोधात ठाकरे हक्कभंग प्रस्ताव आणणार; सरकार धोक्यात? - Mumbai Tak - the uddhav thackeray group is preparing to move a no confidence motion in the legislative council against chief minister shinde 2 - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

CM शिंदेंविरोधात ठाकरे हक्कभंग प्रस्ताव आणणार; सरकार धोक्यात?

Shivsena | Eknath Shinde vs Uddhav Thackeray : मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शिवसेना (UBT) गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अडचणीत आणण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदेंविरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव आणण्याची ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray Grouop) तयारी केली जात आहे. याबाबत आज (सोमवारी) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे […]
Updated At: Mar 26, 2023 22:52 PM

Shivsena | Eknath Shinde vs Uddhav Thackeray :

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शिवसेना (UBT) गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अडचणीत आणण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदेंविरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव आणण्याची ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray Grouop) तयारी केली जात आहे. याबाबत आज (सोमवारी) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या दालनात खलबत झाली. (The Uddhav Thackeray Group is preparing to move a no-confidence motion in the Legislative Council against Chief Minister Shinde.)

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचा आरोप करत देशद्रोही म्हटले होते. याच आरोपांवर आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यासाठी ठाकरे गटातील आमदारांमध्ये बैठकीत चर्चा झाली. याबाबत उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडेही ठाकरे गटाने नोटीस देण्याचे निवेदन दिले. विधान परिषदेत विरोधकांचे संख्याबाळ जास्त असल्याने आता ठाकरेंच्या या खेळीने शिंदे अडचणीत येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Budget Session : पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस-भास्कर जाधव भिडले, काय घडलं नेमकं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका करताना आम्ही चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता, असं म्हटलं होतं. यावर बोलताना शिंदे म्हणाले, जे त्यांचे मंत्री तुरुंगात गेले, हसिना पारकर, दाऊदची बहिण. तिला चेक दिला ज्यांनी देशद्रोह केला, त्यांचा राजीनामा घेण्याचीही धमक नव्हती, बरं झालं, त्यांचे साथीदार अजित पवार आहेत आणि त्यांच्यासोबत चहा पिण्याची वेळ आमची टळली. बरं झालं, असं शिंदे म्हणाले होते.

Shivsena : ठाकरेंच्या आमदारांना शिंदेंचा व्हिप; आदेश डावलल्यास आमदारकी जाणार?

मुख्यमंत्री शिंदे यांच्या याच आरोपांवर विरोधकांनी आक्षेप घेतला असून आता शिंदे सरकारवर विधान परिषदेत अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरु केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात खलबत झाली. याबाबत उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडेही ठाकरे गटाने नोटीस देण्याचे निवेदन दिले.

या गोष्टींमुळे तुमची स्मरणशक्तीही जाऊ शकते निरोगी शरीराची ही आहेत लक्षणं …तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा