...तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील - राजेश टोपेंचा तळीरामांना इशारा

बिअर बार आणि दारुच्या दुकानांवर होणाऱ्या गर्दीवरुन विरोधकांच्या टीकेला टोपेंचं उत्तर
...तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील - राजेश टोपेंचा तळीरामांना इशारा

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉनचा धोका यामुळे सरकारने संपूर्ण राज्यात निर्बंध लागू केले आहेत. रुग्णसंख्येत होणारी वाढ सध्या राज्य सरकारसमोर चिंतेचं कारण ठरली आहे. लोकांनी बाहेर पडून गर्दी करु नये अशा सूचना वारंवार केल्या जात असतानाही दारुच्या दुकानांवर गर्दी असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

सरकारच्या या निर्णयावर टीका करताना सदाभाऊ खोत यांनी क्लास बंद आणि ग्लास सुरु असं म्हटलं होतं. सदाभाऊंच्या या टीकेला उत्तर देताना राजेश टोपे यांनी जर दारुच्या दुकानावर गर्दी होणार असेल तर ते देखील बंद करण्याचा विचार करावा लागेल असे सूचक संकेत दिले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता गर्दी वाढू नये यासाठी हे निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी गर्दी होणार असेल तिकडे कठोर निर्णय घेतला जाईल असं टोपेंनी सांगितलं. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, शनिवारी राज्य सरकारने निर्बंधांची घोषणा केल्यानंतर रविवारी त्यात सुधारणा करुन नवीन नियम जाहीर केले आहेत. शनिवारी जाहीर केलेल्या निर्णयात राज्य सरकारने ब्युटी पार्लर आणि जिम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतू सुधारित आदेशात सरकारने ब्युटी पार्लर आणि जिम ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे.

या सुधारित निर्णयाप्रमाणे या सेवा घेताना मास्क काढण्याची परवानगी नसणार आहे. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच या सेवा पुरवल्या जाणार आहेत. याचसोबत सलूनमधील कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण होणं गरजेचं असल्याचंही सरकारने या सुधारित आदेशात स्पष्ट केलं आहे.

...तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील - राजेश टोपेंचा तळीरामांना इशारा
महाराष्ट्रातील निर्बंधांमध्ये महत्वाचे बदल : ब्युटी पार्लर आणि जिम ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in