'...तेव्हा स्त्रीच्या चारित्र्याची हत्या केली जाते', कॉस्मेटिक सर्जरीच्या आरोपाला अमृता फडणवीसांचं 'हे' उत्तर

Amrita Fadnavis answer to the allegation of cosmetic surgery: कॉस्मेटिक सर्जरीवरुन अमृता फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना आता त्यांनी उत्तर दिलं आहे.
'...तेव्हा स्त्रीच्या चारित्र्याची हत्या केली जाते', कॉस्मेटिक सर्जरीच्या आरोपाला अमृता फडणवीसांचं 'हे' उत्तर
they abuse her mentally thru their crooked traffickers amruta fadnavis criticized to opponent nishant varma tweet(फोटो सौजन्य: Amruta Fadnavis/ Facebook)

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणानंतर राज्यातील संपूर्ण राजकारण हे ढवळून निघालं आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील आता विरोधकांना उत्तर देत असल्याचं पाहायला मिळालं आहे. अमृता फडणवीस यांच्यावर कॉस्मेटिक सर्जरीवरुन एका राजकीय विश्लेषकाने काही आरोप केले आहेत ज्याला त्यांनी उत्तर दिलं आहे आणि विरोधकांवरही निशाणा साधलाय.

'जेव्हा एखादी स्त्री बिघडलेल्या आणि खोडकर लोकांच्या विरोधात बोलते तेव्हा हे राक्षस तिला खाली खेचण्याचा कट रचतात.' असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.

निशांत वर्मा या एका राजकीय विश्लेषकाने अमृता फडणवीस यांनी एका कॉस्मेटिक सर्जनची फसवणूक केल्याचा आरोप केला. ज्याला अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच निशांत वर्मा यांनी केलेल्या आरोपाबाबत मुंबई पोलीस काय कारवाई करणार? असा सवालही विचारला आहे.

अमृता फडणवीसांनी साधला विरोधकांवर जोरदार निशाणा

'जेव्हा एखादी स्त्री बिघडलेल्या आणि खोडकर लोकांच्या विरोधात बोलते तेव्हा हे राक्षस तिला खाली खेचण्याचा कट रचतात. ते त्यांच्या कुटील तस्करांद्वारे तिचे मानसिक शोषण करतात. जे तिच्या चारित्र्याची हत्या करतात आणि तिच्या शरीरावर कुरूप टीका करतात. अशा मुखवटा परिधान केलेल्या गुन्हेगारांवर मुंबई पोलीस कारवाई करणार?' असं म्हणत अमृता फडणवीस यांनी निशांत वर्मा यांच्यासह विरोधकांवर देखील निशाणा साधला आहे.

निशांत वर्मा यांचा नेमका आरोप काय?

निशांत वर्मा या राजकीय विश्लेषकाने अमृता फडणवीसांवर आरोप करताना असं ट्विट केलंय की, 'अमृता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पती मुख्यमंत्री असताना एका कॉस्मेटिक सर्जनची फसवणूक केली. ज्याने त्यांची रायनोप्लास्टी (Rhinoplasty - नाकाची सुधारणा शस्त्रक्रिया), ब्लेफेरोप्लास्टी (Blepharoplasty - हे पापण्यांचे दोष, प्लास्टिक सर्जरी ऑपरेशन) आणि हेअर इम्प्लांट केले होते. अमृता फडणवीस यांनी याचं बिल दाखवून मला चुकीचं ठरवावं' असे आरोप निशांत वर्मा यांनी ट्विटरवरुन केले आहेत.

दरम्यान, याच निशांत वर्मा यांनी याआधीही एका ड्रग्स पेडलरवरुन भाजपबाबत काही सवाल उपस्थित केले होते. त्यावेळीही त्यांनी अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर केला होता. आता देखील निशांत वर्मा यांनी पुन्हा एकदा आरोप करुन अमृता फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.

कोण आहेत निशांत वर्मा?

निशांत वर्मा हे स्वत:ला राष्ट्रीय राजकीय विश्लेषक असल्याचं सांगतात. त्यांच्या ट्विटर अकाउंटवर देखील त्यांनी असंच म्हटलं आहे. दरम्यान, त्यांच्या ट्विटर अकाउंट पाहिल्यास एक लक्षात येईल की, ते भाजपविरोधात अनेक वक्तव्य करतात. तसेच भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर देखील सातत्याने टीका करत असल्याचं त्यांच्या ट्विटर हँडलवरुन पाहायला मिळत आहे.

they abuse her mentally thru their crooked traffickers amruta fadnavis criticized to opponent nishant varma tweet
मलिक विरुद्ध फडणवीस : 'त्यांचं एकच लक्ष्य आहे'; अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर 'ट्वीट' हल्ला

'या' ड्रग्स पेडलरचं भाजपसोबत कनेक्शन काय? निशांत वर्मांनी केला होता गंभीर आरोप

निशांत वर्मा यांनी 31 ऑक्टोबर रोजी अमृता फडणवीस यांचा एक फोटो शेअर करुन अत्यंत खळबळजनक असे आरोप केले होते. 'जयदीप राणा हा एक ड्रग्स पेडलर असून त्याला जून 2021 मध्ये एनसीबीने अटक केली आहे. जो अद्यापही तुरुंगातच आहे. अशावेळी भाजपचं त्याच्या नेमकं कनेक्शन काय?' अशा आशयाचं ट्विट निशांत वर्मा यांनी केलं होतं.

ज्यानंतर याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी देखील हाच फोटो शेअर करुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्स प्रकरणी खळबळजनक आरोप केले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in