Covid 19 : राज्यात दसरा, दिवाळीनंतर तिसरी लाट? जाणून घ्या काय म्हणाले राजेश टोपे?

जाणून घ्या राजेश टोपे यांनी नेमकं काय भाष्य केलं आहे...
Covid 19 : राज्यात दसरा, दिवाळीनंतर तिसरी लाट? जाणून घ्या काय म्हणाले राजेश टोपे?
आरोग्यमंत्री राजेश टोपे फोटो-इंडिया टुडे

महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येत घट दिसते आहे, दुसरी लाट ओसरत असतानाच आता राज्यात दसरा दिवाळीनंतर तिसरी लाट येऊ शकते असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला आहे. महाराष्ट्रात आजच म्हणजचे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी मंदिरं सुरू करण्यात आली. याआधीही टप्प्याटप्प्याने अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अशात आज राजेश टोपे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्श घेतलं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मिशन कवच कुंडल या नवीन मोहिमेची घोषणाही केली. या मोहिमच्या अंतर्गत राज्यात 15 ऑक्टोबर पर्यंत वेगाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यात कुठेही लसींची कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली जाईल असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आङे. 8 ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवारपासून राज्यात रोज 15 लाख लसीकरण करण्यात येणार आहे. आपल्याकडे सध्या एक कोटी लसी उपलब्ध आहेत अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली.

कोरोना रूग्णसंख्या
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

तिसऱ्या लाटेबद्दल काय म्हणाले राजेश टोपे?

दसरा आणि दिवाळी यानंतर तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवरच आपण विशेष लसीकरण मोहीम राबवत आहोत. जेणेकरून आरोग्यावर गंभीर परिणाम होणार नाही. लसीकरण हाच आता मोठा पर्याय आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुस्लिम बांधवही मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घेत आहेत मात्र मालेगावसारख्या ठिकाणी अद्यापही लसीकरण म्हणावं तसं झालेलं नाही. त्या ठिकाणी धर्मगुरू, मौलवी आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने लसीकरण केलं जाईल असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे
Covid 19 Third Wave आणि लहान मुलांच्या आणि पालकांच्या मनात असलेली भीती

महाराष्ट्रात बुधवारी 2876 नवे रूग्ण

महाराष्ट्रात बुधवारच्या दिवसभऱात 2876 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे तर 90 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात आज 2763 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 63 लाख 91 हजार 662 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.32 टक्के इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.