हे अमर-अकबर-अँथनीचं सरकार, शिवसेना यामध्ये अकबर : रावसाहेब दानवेंचा टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. बुलढाण्यात पक्ष संघटनेच्या कामासाठी आले असताना पत्रकारांशी संवाद साधताना रावसाहेब दानवेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार हे अमर-अकबर-अँथनीचं सरकार असून शिवसेना यातली अकबर असल्याचं रावसाहेब दानवे म्हणाले.

शिवसेना या सरकारमधली अकबरच आहे. शिवसेना आज नाही अकबर झाली. शिवसेनेने आता गीतेचं पठन करण्याऐवजी नमाजचे वर्ग घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे ते आता अकबरच झाले आहेत असं दानवे म्हणाले. यावेळी बोलत असताना दानवेंनी भविष्यात मनसेसोबत युतीचा प्रस्तावही फेटाळून लावला. मनसे जोपर्यंत परप्रांतीयाबाबतच्या भूमिकेत बदल करत नाही तोपर्यंत युती शक्य नाही असं दानवेंनी स्पष्ट केलं.

‘उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव पाठवला होता’; चार मुद्द्यांवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“या सरकारमध्ये प्रत्येकाचा रोल वेगळा आहे, त्यामुळे कोणाला एकाला नाव ठेवता येणार नाही. हे सरकार अमर-अकबर-अँथनीचं सरकार आहे असं मी म्हणातो कारण हे तिघे पक्ष कधीच एकत्र बसत नाहीत. तिघेही एकत्र येऊन राज्याचा विचार करत नाहीत ज्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित पडले आहेत. मराठा आरक्षणाचा विषय घ्या…आम्ही आरक्षण मिळवून दिलं, ते कोर्टात टिकवून दाखवलं. या सरकारला हे आरक्षण टीकवता आलं नाही. कोर्टात वकिलांची फौज उभी करणं या सरकारला जमलं नाही. ओबीसी आरक्षणाचा गोंधळ झाला. कोर्ट वारंवार यांच्याकडे इम्पिरिकल डेटा मागत आहे, तो डेटा यांनी अजुनही कलेक्ट केला नाही. निवडणुक घेण्याचा अधिकार आयोगाकडे होता पण तो अधिकारही त्यांनी कायदा करुन आपल्याकडे घेतला.”

ओबीसी-मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या परिक्षेचा प्रश्न असो..हे सरकार एकत्र येऊन बोलत नाही. प्रत्येक जण या सरकारमध्ये वेगळंच बोलतो. कोण घरात बसून आदेश देणं, कोण घराबाहेर पडून आदेश देतं तर कोण दिसतच नाही अशा प्रकारचं हे सरकार असल्याची टीका दानवेंनी केली.

ADVERTISEMENT

धर्मवीर मु.पो. ठाणे’ चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणार प्रसाद ओक

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT