Aryan Khan प्रकरणात समीर वानखेडेंचे चौकशीचे अधिकार काढले, नवाब मलिक म्हणतात...

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या कार्यपद्धतीवर केले होते आरोप
Aryan Khan प्रकरणात समीर वानखेडेंचे चौकशीचे अधिकार काढले, नवाब मलिक म्हणतात...

मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची चौकशी करणारे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. आर्यन खानसह पाच प्रमुख प्रकरणांमध्ये समीर वानखेडे यांच्या चौकशीचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत.

या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी, ही तर फक्त सुरुवात आहे असं म्हणत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यावर भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये मलिक म्हणतात, "आर्यन खानसह ५ प्रकरणांमध्ये समीर वानखेडे यांना चौकशीवरुन हटवण्यात आलं आहे. अजुन २६ प्रकरणं आहेत ज्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, ही यंत्रणा सुधारण्यासाठी खूप काही करणं गरजेचं आहे आणि आम्ही ते करु".

आर्यन खान NCB च्या अटकेत असताना नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केला होता. आर्यन खान प्रकरणात NCB ने पंच म्हणून वापरलेले साक्षीदार, वानखेडेंच्या बहिणीचा फ्लेचर पटेल नामक व्यक्तीसोबतचा फोटो, वानखेडेंचं पहिलं लग्न, त्यांचं जातप्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यातच पंच प्रभाकर साईल यांनी NCB वर खंडणीचे आरोप केल्यानंतर समीर वानखेडेंची चौकशी सुरु झाली आहे.

काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या जीवनशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन ते वापरत असलेले महागाचे सुट, घड्याळ हे कुठून येतात असा प्रश्न विचारला होता. समीर वानखेडेंनी नवाब मलिक यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणातून हटवण्यात आल्यानंतर त्यांच्याशी आज तकने संपर्क साधला. ज्यानंतर त्यांनी आज तकला फोनवरून प्रतिक्रिया दिली आहे.

Aryan Khan प्रकरणात समीर वानखेडेंचे चौकशीचे अधिकार काढले, नवाब मलिक म्हणतात...
NCB च्या समीर वानखेडेंना झटका, आर्यन खान प्रकरणासहीत पाच केसेसच्या चौकशीचे अधिकार काढले

काय म्हणाले आहेत समीर वानखेडे?

मी मुंबई एनसीबीचा झोनल डायरेक्टर आहे, यापुढेही असणार आहे. माझ्याकडून हे पद काढून घेण्यात आलेलं नाही. आर्यन खान प्रकरणी माझ्यावर नवाब मलिक यांनी आरोप केले होते. त्यामुळे नवाब मलिकांनी केलेल्या आऱोपांची आणि आर्यन खान प्रकऱणाची चौकशी SIT कडून चौकशी करावी असं मीदेखील सुचवलं होतं. त्यामुळे आता हे प्रकरण माझ्याकडून काढून घेतलं हे एक प्रकारे बरंच झालं. मी ड्रग्ज प्रकरणात ज्या काही खास मोहिमा असतील त्या राबवत राहणार. मला दिल्लीत बोलवण्यात आलेलं नाही. मात्र मला या केसमधून वेगळं करण्यासाठीची ऑर्डर समोर मला मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in