Chhath Pooja: हजारो नागरिक जीव धोक्यात घालून करतायेत छठ पूजा

Chhath Pooja Kalyan-Dombivli: कल्याण-डोंबिवलीमध्ये हजारो नागरिक हे छट पुजेसाठी आपला जीव धोक्यात घालत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.
Chhath Pooja: हजारो नागरिक जीव धोक्यात घालून करतायेत छठ पूजा
thousands citizens risking their lives for Chhath pooja crossed railway track kalyan dombivli

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली

कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या संख्येने नागरिक छठपूजा करतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही कल्याण डोंबिवलीतील हजारो छठ पूजा करणारे आपला जीव धोक्यात घालून रेल्वे ट्रॅक ओलांडून खाडीच्या घाटावर पोहोचले.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान कचोरे येथे छठ पूजेला जाण्यासाठी नागरिकांकडे दुसरा पर्याय नाही. खाडीकिनारी गणेश घाटावर जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून येथील नागरिकांना घाटावर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते.

याबाबत स्थानिक नेते व नागरिकांनी बोगदा करण्यासाठी महापालिका प्रशासन व रेल्वे प्रशासनाकडे अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. मात्र, प्रशासनाला जाग येत नसून दरवर्षी हजारो नागरिकांना गणपती विसर्जन व छठपूजेला जाताना रेल्वे ट्रॅक ओलांडावा लागत आहे.

अनेक वर्षांपासून हजारो उत्तर भारतीय नागरिक कचोरे गणेश घाटावर छठपूजा करतात. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात हजारो जण छठमैय्या यांच्या नावाचा उपवास करतात. सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाची पूजा केली जाते. स्त्रिया सुख, समृद्धी आणि पुत्रप्राप्तीसाठी कामना करतात, उत्तर भारतीय नागरिकांसाठी या सणाला खूप महत्त्व आहे.

thousands citizens risking their lives for Chhath pooja crossed railway track kalyan dombivli
रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे पुण्यातील शेकडो रेल्वे प्रवाशांचे वाचले प्राण

कोरोना नियमांचाही उडाला फज्जा

दुसरीकडे याच कार्यक्रमात कोरोना नियमांचा देखील फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर सरकारने कोरोना नियमांचे पालन करून छठ पूजा करण्यास परवानगी दिली. मात्र छठ पूजा करणाऱ्या महिलांसोबत, पुरुष देखील कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. एवढंच नव्हे तर अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क देखील नसल्याचं चित्र यावेळी इथे पाहायला मिळालं नाही.

ठाकुर्लीतील नागरिकांचा रोज जीवाशी खेळ

दरम्यान, कल्याण-डोंबिवलीच्या मधील स्टेशन असलेल्या ठाकुर्लीतील नागरिकांना रोज आपला जीव धोक्यात टाकावा लागतो. कारण येथील नागरिकांना लोकल ट्रेन पकडण्यासाठी ट्रॅकमधूनच पायपीट करावी लागते. आतापर्यंत येथे काही रेल्वे अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत. मात्र, असं असलं तरीही रेल्वे प्रशासन येथील नागरिकांच्या या समस्येकडे आतापर्यंत कानाडोळाच करत आलं आहे. गेले अनेक वर्ष येथील नागरिक या समस्येकडे रेल्वे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना अद्याप तरी त्यात यश आलेलं नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in