चायनीज स्मार्टफोन फेकून द्या, ‘या’ देशाचं आपल्या नागरिकांना कळकळीचं आवाहन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘मेड इन चायना’ स्मार्टफोनबाबत (Chinese phones) आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. युरोपातील लिथुआनिया या देशातील सरकारने आपल्या नागरिकांना चीनी स्मार्टफोन (Smartphone) फेकून देण्यास सांगितले आहे. एवढेच नाही तर त्यांच्या सरकारने असेही म्हटले गेले आहे की, भविष्यात चीनी फोन खरेदी करू नका.

सरकारने यासाठी दोन स्मार्टफोन निर्मात्यांची नावेही अधोरेखित केली आहेत. यात Xiaomi आणि Huawei या कंपन्यांचे स्मार्टफोन फेकून देण्यास सांगितले आहे. खरं म्हणजे फोनच्या बिल्ट इन सेन्सॉरशिपमुळे लिथुआनिया सरकारने आपल्या नागरिकांना असं करण्यास सांगितंलं आहे. येथील सरकारचा असा दावा आहे की, बिल्ट इन सेन्सॉरशिपमुळे काही टर्म्स फोनमध्ये ब्लॉक झाल्या आहेत.

दरम्यान, लिथुआनियाने हा आरोप अशा वेळी केला आहे की, जेव्हा दोन्ही देशांमधील संबंध चांगले नाहीत. चीनी स्मार्टफोनवरील हे आरोप लिथुआनियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्राच्या एका नवीन अहवालात करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील गांभीर्य अधिक वाढलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अहवालात असे सांगण्यात आले आहे की, Xiaomi कंपनीच्या फोनमध्ये 449 टर्म्संना सिस्टम अॅप आपोआप सेन्सॉर करते. यामध्ये फ्री तिबेट, लॉंग लीव तैवान इंडिपेंडन्स, डेमोक्रसी मूव्हमेंट सारख्या शब्दांचा समावेश आहे. लिथुआनिया सायबर सिक्युरिटीच्या मते, युरोपमध्ये शाओमीचा फ्लॅगशिप फोन Mi 10T 5G मध्ये देखील सेन्सॉरशिप कॅपेबिलिटी आढळून आली आहे.

एजन्सीने असेही म्हटले आहे की, याला युरोपियन युनियन रिजनसाठी बंद करण्यात आले आहे परंतु ते कधीही रिमोटली चालू केले जाऊ शकते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, लिथुआनियाचे संरक्षण उपमंत्री Margiris Abukevicius यांनी लोकांना नवीन चीनी फोन न खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय जुना फोन लवकरात लवकर टाकून देण्यासही सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

जेव्हा India Today Tech ने या प्रकरणी Xiaomi च्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी याबाबत अशी माहिती दिली की, त्यांच्या कोणत्याही डिव्हाइसमध्ये कोणत्याही प्रकारचे सेन्सॉरशिप सॉफ्टवेअर लावण्यात आलेले नाही. आम्ही यूजर्सच्या कायदेशीर अधिकारांचा आदर करतो आणि त्यांचे संरक्षण करतो.

ADVERTISEMENT

नॅशनल सायबर सेंटर लिथुआनियाच्या मते, चीनी स्मार्टफोनमध्ये आणखी एक दोष आढळला. शाओमीबाबत, असे म्हटले गेले आहे की, हा फोन सिंगापूरमधील सर्व्हरवर एन्क्रिप्टेड फोन युजेज डेटा पाठवत आहे.

याशिवाय, Huawei P40 5G मध्ये देखील एक दोष आढळून आला आहे. दरम्यान, Huawei ने हे आरोप फेटाळले आहेत. बीएनएस न्यूज वायरशी बोलताना Huawei ने लिथुआनिया सरकारच्या आरोपांचं खंडन केलं आहे. दरम्यान, लिथुआनिया सरकारने केलेल्या तपासणीत वन प्लस फोनबाबत अद्याप तरी कोणतीही तक्रार समोर आलेली नाही.

गलवान खोऱ्यात आमचे पाच सैनिक ठार, चीनने वर्षभराने दिली कबुली

भारतातही चीनी फोनबद्दल नाराजी

दरम्यान, भारतातही अनेकांच्या मनात चीनी फोनबद्दल नाराजी आहे. चीन हा सातत्याने सीमारेषेवरील भागात भारताच्या कुरापती काढण्याचा प्रयत्न करत असतं. त्यामुळे चीनमधील वस्तूंवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी अनेकांकडून सातत्याने करण्यात येते. विशेषत: मोबाइल फोनवर. मात्र, असं असलं तरी भारत तांत्रिकदृष्ट्या अद्यापही स्वयंपूर्ण झालेला नाही. त्यामुळे अशाप्रकारचा निर्णय एका झटक्यात घेता येणं शक्य नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT