Shivsena-BJP: वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची-संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर वाघाशी मैत्री करायला आम्ही तयार आहोत असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. याबाबत खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत पक्षबांधणीच्या निमित्ताने पाच दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विषयावर भाष्य केलं. चंद्रकांत पाटील गोड माणूस आहे, त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत अशा शुभेच्छाही संजय राऊत यांनी दिल्या आहेत.

BJP-Shiv Sena: ‘वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार’, भाजपची शिवसेनेला थेट ऑफर

पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करू नये

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नरेंद्र मोदी हे भाजपा आणि देशाचे मोठे नेते आहेत. जे यश भाजपला प्राप्त झालं आहे ते त्यांच्या चेहऱ्यामुळेच आहे. पण पंतप्रधान हे देशाचे असतात, त्यांनी राजकीय प्रचार करु नये. कोणत्याही पक्षाचा प्रचार करु नये. ते देशाचे पंतप्रधान आहेत. फोटो वापरणे हे कार्यकर्त्यांवर असतं. बाळासाहेबांचा फोटो वापरला जातो, वाजपेयींचा वापरा जात होता. हे असं ठरवून होत नाही, लोकांच्या मनात तो नेता असतो, असं संजय राऊत म्हणाले.

मालाड दुर्घटना दुर्दैवी

ADVERTISEMENT

मालाड इमारत दुर्घटना दुर्दैवी आहे. टीका करणाऱ्यांना करु द्या, स्वत: मुख्यमंत्री काल रस्त्यावर उतरले. सगळेच काल रस्त्यावर उतरले होते. टीका करणाऱ्यांना काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

‘दोन मोठ्या माणसांच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली हे आपण कसं सांगू शकतो? अंदाज व्यक्त करायला आपण काहीही करु शकतो. वाघाशी आमची दुश्मनी कधीही नव्हती. त्यांची जुनी मैत्री ही मोदींशी आहे.’

‘ते काय म्हणतात माझं फडणवीस आणि पाटलांशी जमत नाही. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्यांची तिकडे दोस्ती आहे. इकडे असती तर १८ महिन्यांपूर्वीच सरकार आलं असतं. पण सर्वोच्च नेत्याने आम्हाला आदेश दिला तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत.’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT