
अखेर १४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. शुक्रवारी रात्री मुंबईतील माटुंगा-दादर रेल्वे स्थानकादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून निघालेल्या पुदुच्चेरी एक्सप्रेसला गदग एक्स्प्रेसने दिली होती. या दुर्घटनेत तीन डबे रुळावरून घसरले होते.
त्यानंतर शनिवारी सकाळी अप मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली होती. दुपारी १ वाजता सर्वच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या दुर्घटनेमुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल आणि लांब पल्ल्याच्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
मुंबईतील मध्य रेल्वेवरील माटुंगा रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी रात्री पुद्दुचेरी एक्स्प्रेस (11005) आणि गदग एक्सप्रेस यांच्यातील अपघातामुळे पुद्दुचेरी एक्स्प्रेस तीन डबे घसरले होते. त्यामुळे काल रात्रीपासून मध्य रेल्वेचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेलं होतं.
अपघातानंतर फास्ट ट्रॅकवरील वाहतूक अनेक तासांपासून ठप्प होती. अखेर अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर फास्ट ट्रॅकच्या अप लाइनवरील वाहतूक ही सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास सुरळीत झाली. त्यानंतर डाऊन मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू होतं.
मध्य रेल्वेवरील सर्वच वाहतूक विस्कळीत झाल्यानं असून फास्ट आणि स्लो ट्रॅकवरील अनेक लोकल या जवळजवळ 25 ते 30 मिनिटं उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागला.
एक्सप्रेसच्या अपघातानंतर स्लो ट्रॅकवरुन लोकल आणि एक्सप्रेस ट्रेनची वाहतूक सुरु करण्यात आली होती. त्यामुळे अनेक गाड्या या उशिराने धावत होत्या. अपघातात एक्सप्रेसचे जे तीन डब्बे घसरले होते. त्यापैकी दोन डब्बे हटविण्यात यश आलं असून आणि एक डब्बा आता हटविण्यात येत आहे.
नेमका अपघात कसा झाला?
मुंबईतल्या माटुंगा स्टेशनजवळ रेल्वेचा अपघात झाला. दादर पुद्दुचेरी या एक्स्प्रेसचे शेवटचे तीन डबे घसरले. रात्री उशिरा ही घटना घडली. गदग एक्स्प्रेसच्या इंजिनने दादर पुद्दुचेरी एक्स्प्रेसला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. रात्रीच्या वेळी मुंबईतून अनेक एक्स्प्रेस सुटतात. मात्र अपघात झाल्याने त्या सेवांवर आणि लोकल सेवांवरही परिणाम झाला.
या अपघातानंतर फास्ट ट्रॅकवरच्या लोकल या स्लो ट्रॅकवर वळवण्यात आल्या. त्यामुळे स्लो ट्रॅकवर अतिरिक्त वाहतुकीचा बोजा पडला. त्यामुळेच मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. अनेक प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यास एरवी अर्धा तास ते एक तास लागतो त्याऐवजी दीड तास लागत होता.