Kirit Somaiya यांनी 72 तासांमध्ये माफी मागितली नाही तर… अनिल परब यांनी दिला इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी 72 तासांमध्ये माफी मागावी नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचा इशारा परीवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी परीवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जे आरोप केले आहेत त्या आरोपांचं पुराव्यांसह स्पष्टीकरण द्यावं अन्यथा 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करणार अशी नोटीस परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वकिलांनी किरीट सोमय्यांना पाठवली आहे.

काय म्हणाले होते किरीट सोमय्या?

अनिल परब यांनी मंत्री असूनही बेकायदेशीर रिसॉर्ट त्यांनी बांधलं त्याचा मालमत्ता करही भरला. मंत्री मोहदय हे स्वतः बेकायदेशीर बांधकाम करतात आणि त्यांना वाचवण्याचं पाप मुख्यमंत्री करत आहेत. अनिल परब यांनी केलेल्या बेकायदेशीर कारवाईचे आदेश दिले गेले आहेत. असं असूनही असा माणूस मंत्रिमंडळात कसा काय राहू शकतो? अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. एवढंच नाही तर अनिल देशमुख आणि अनिल परब या दोघांनाही तुरुंगात जावंच लागणार असंही किरीट सोमय्या म्हणाले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अनिल परब यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने नोटीसही बजावली होती. एका सीएने अधिकृतरित्या महाराष्ट्र सरकाला अहवाल दिला, की हे रिसॉर्ट बांधण्यात 5 कोटी 42 लाख 44 हजार 200 रुपये खर्च झाले आहेत. अनिल परब यांनी एक दमडीचा खर्च देखील स्वतःच्या खात्यात दाखवलेला नाही. मग रिसॉर्ट बांधण्याचा पैसा कुठून आला? सचिन वाझेचा वसुलीमधला पैसा होता? किरीट सोमय्यांनी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर अनिल परब यांनी स्वतःच्या मित्राला, सदानंद कदमच्या नावाने हा रिसॉर्ट १ कोटी रुपयात करून टाकला. बांधकामाचा खर्च 5 कोटी 42 लाख बाजारभाव ग्रामपंचायतीनुसार 21 कोटी आणि 1 कोटीत अॅग्रीकल्चर लेन म्हणून विकला, असाही आरोप सोमय्यांनी कागदपत्रं दाखवून केला होता.

किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर दहा वेगवेगळ्या घोटाळ्यांची चौकशी सुरू असल्याचा आरोप केले. एसटी महामंडळ तिकीट घोटाळा, म्हाडाची जमीन लंपास करणे, दापोलीला अनधिकृत 10 कोटींचा रिसॉर्ट बांधणे, आरटीओ ट्रान्सफर घोटाळा, सचिन वाझेचे मुंबई महापालिका कॉन्ट्रॅक्टर घोटाळा, भेंडी बाजारमधील मोठा री-डेव्हलपमेंट प्रकल्प 50 कोटींचा घोटाळा अशा अनेक चौकशी अनिल परब यांच्या विरोधात सुरू असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.

ADVERTISEMENT

नाशिक पोलीस, लोकयुक्तांकडं अनिल परब यांच्या तीन प्रकरणांची चौकशी सुरू आहे. तसंच सीबीआय, एसीबी, ईडी, एनआयए, अँटी करप्शन देखील या घोटाळ्यांची चौकशी करत आहेत. तसंच राज्यपालांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनिल परब हे दोन महिन्यांचे पाहुणे असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT