ऑक्सिजनवरुन राजकारण : कर्नाटकने महाराष्ट्राचा ५० टन ऑक्सिजन साठा रोखला – सतेज पाटील

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आजही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर अनेक ठिकाणाहून राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा होतो आहे. परंतू देश खडतर काळातून जात असताना प्राणवायूच्या पुरवठ्यावरुन भाजप विरुद्ध अन्य पक्षांची सरकार असलेल्या राज्यांत पुन्हा एकदा राजकारण सुरु आहे. कर्नाटकामधील बेल्लारीमधून महाराष्ट्रात येणारा ५० टन ऑक्सिजनचा कोटा सरकारने रद्द केल्याची माहिती राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

कर्नाटकातून कोल्हापुरात येणाऱ्या ऑक्सिजनमधून कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदूर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांना पुरवठा होतो. मात्र हा पुरवठा रोखण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने राज्यात तयार होणाऱ्या ऑक्सिजन प्लांटमधून हा कोटा भरुन काढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे या पाचही जिल्ह्यांत मिळणारा ऑक्सिजन पुरवठा लवकरच सुरळीत होईल अशी आशा सतेज पाटील यांनी व्यक्त केली. प्रत्युत्तरादाखल राज्य सरकारने कोल्हापुरातून गोव्यात जाणारा १० टन ऑक्सिजनचा साठा थांबवला असून बेल्लारीतून येणाऱ्या साठ्यामधून १० टन ऑक्सिजन हा थेट गोव्यात पाठवण्यात यावा अशी विनंती राज्याने केंद्राला केली आहे.

अमरावती : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, प्रशासनाची चिंता कायम

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गोवा आणि कर्नाटकात भाजपचे सरकार आहे….महाराष्ट्राला मिळणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावरुन गेल्या काही दिवसांमध्ये केंद्र आणि राज्यात चांगलाच वाद रंगला होता. सर्वोच्च न्यायालयानेही ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल सरकारचे कान उपटल्यानंतरही ऑक्सिजन पुरवठ्यावरुन राजकारण रंगताना दिसत आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत असताना सतेज पाटील यांनी प्रशासनाने शहरात एका दिवशी ३३०० रुग्ण सापडतील असं पकडून चालत कोविड सेंटर आणि बेड्सची सोय केली आहे. कोल्हापुरात कोणालाही बेड कमी पडणार नाही याची काळजी प्रशासन घेईल अशी ग्वाही सतेज पाटील यांनी दिली. परंतू ऑक्सिजनचा पुरवठा आणि रेमडेसिव्हीरची कमतरता या सर्व गोष्टी केंद्राच्या हातात आहेत. केंद्राने राज्याचा कोटा पाठवल्यानंतर या सुविधा लोकांपर्यंत पोहचवता येतील. तोपर्यंत लोकांनी जनता कर्फ्यू आणि लॉकडाउनचे नियम पाळून सरकारला मदत करावी असं आवाहन पाटील यांनी केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT