'काय बाई सांगू' ते 'पप्प्या घेण्याची नौटंकी'; साताऱ्यात निवडणुकीमुळे दोन्ही राजेंमध्ये रंगला कलगीतुरा

आचारसंहीता लागण्याआधी सातऱ्यात विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपुजनाचा धडाका
'काय बाई सांगू' ते 'पप्प्या घेण्याची नौटंकी'; साताऱ्यात निवडणुकीमुळे दोन्ही राजेंमध्ये रंगला कलगीतुरा

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीनिमीत्त जिल्ह्यात सुरु झालेलं राजकारण आता जरा शांत होतंय असं वाटत असतानाच आगामी नगरपालिका निवडणुकीच्या निमीत्ताने पुन्हा एकदा राजकीय रंग चढायला सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यातील दोन महत्वाचे नेते म्हणून ओळख असलेल्या उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात आगामी निवडणुकीच्या निमीत्ताने कलगीतुरा रंगताना दिसत आहे. ज्यात साताऱ्याच्या विकासकामांवर तोडगा निघण्याची चिन्ह दिसत नसली तरीही सातारकरांचं यामुळे चांगलंच मनोरंजन होत आहे.

या कलगीतुऱ्याची सुरुवात झाली ती राज्यसभेचे खासदार उदयनराजेंकडून. सातारा नगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या भूमिपुजन प्रसंगी उदयनराजेंनी थेट शिवेंद्रराजेंचा चर्चेचं आवाहन दिलं. "आमचा उल्लेख नारळफोडी गँग असा केला असला तरीही आम्ही कामं केली म्हणूनच नारळ फोडतो. एखाद्याचं घरदार आम्ही उध्वस्त केलं नाही. चर्चेला यायचं असेल तर उदयनराजे कधीही तयार आहेत मात्र त्यासाठी धाडस असावं लागतं. कारण नसताना आमदार शिवेंद्रराजेंकडून वैय्यक्तिक टीका सुरु असल्याचं", उदयनराजेंनी यावेळी बोलताना सांगितलं.

उदयनराजेंनी म्हटलेल्या या गाण्याचा शिवेंद्रराजेंनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. तुम्हाला नेमकी कशाची लाज वाटते हे एकदा सांगूनच टाका असं म्हणत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. उदयनराजेंनी भूमिपूजन केलेल्या कार्यक्रमावर बोट ठेवत शिवेंद्रराजेंनी, या इमारतीचा प्रस्ताव आणि बजेट अद्याप ठरलेलं नाही. इमारतीला अद्याप तांत्रिक मान्यता नाही पण तरीही सत्ताधारी नारळ फोडून आणि गाणी गाऊन मोकळे झाले अशा शब्दांत समाचार घेतला.

'काय बाई सांगू' ते 'पप्प्या घेण्याची नौटंकी'; साताऱ्यात निवडणुकीमुळे दोन्ही राजेंमध्ये रंगला कलगीतुरा
'उदयनराजे अफाट बुद्धीचे म्हणूनच हातची खासदारकी सोडली', शिवेंद्रराजेंची बोचरी टीका

गाणी गाण्यापेक्षा तुम्हाला नेमकी कशाची लाज वाटते हे सातारकरांना कळू दे. निवडणुका आल्या की नेहमी रडारड करायची आणि पप्पी घ्यायची हे आता नेहमीचच झालं आहे. ५ वर्ष तुम्हाला सत्ता दिली तेव्हा तुम्ही भ्रष्टाचारमुक्त पालिका करणार होतात त्याचं काय झालं असा सवाल यावेळी शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना विचारला.

पाईपलाईनच्या कार्यक्रमात शिवेंद्रराजे चढले जेसीबीवर
पाईपलाईनच्या कार्यक्रमात शिवेंद्रराजे चढले जेसीबीवर

याचदरम्यान शिवेंद्रराजेंचा एक वेगळा अंदाज सातारकरांना पहायला मिळाला. आचारसंहीता लागू होण्याआधी सध्या शहरात भूमिपुजन आणि उद्घाटनाचा धडाका सुरु आहे. शिवेंद्रराजेंनी आज अजंठा चौकात पाईप लाईनच्या उद्घाटनाप्रसंगी जक्क जेसीबीचा ताबा घेत उपस्थितांची मनं जिंकली. पालिका निवडणुकीच्या निमीत्ताने दोन्ही राजेंमध्ये सुरु झालेलं हे शाब्दीक युद्ध आता कुठपर्यंत जाऊन पोहचतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

'काय बाई सांगू' ते 'पप्प्या घेण्याची नौटंकी'; साताऱ्यात निवडणुकीमुळे दोन्ही राजेंमध्ये रंगला कलगीतुरा
सातारा : उदयनराजे म्हणजे नारळफोड्या गँग; आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची टीका

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in