'उद्धव ठाकरे खासगी रूग्णालयात उपचार घेतात, म्हणजे सरकारी रूग्णालयं चांगली नाहीत'

जाणून घ्या असं नेमकं का म्हणाले चंद्रकांत पाटील?
'उद्धव ठाकरे खासगी रूग्णालयात उपचार घेतात, म्हणजे सरकारी रूग्णालयं चांगली नाहीत'

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची मान दुखावली असल्याने ते उपचार घेण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने रूग्णालयात दाखल झाले आहेत. बुधवारीच यासंदर्भातली माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रक काढून दिली. मान वर करायलाही वेळ नव्हता, त्यामुळे मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगत आपल्या त्रासाबद्दल त्यांनी माहिती दिली. ते खासगी रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्यावरून आता चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

राज्याचे मुख्यमंत्री खासगी रूग्णालयात दाखल होतात, याचा अर्थ सरकारी रूग्णालयं चांगली नाहीत हे ते मान्य करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाला तेव्हा त्यांनी सेंट जॉर्ज या सरकारी रूग्णालयात उपचार घेतले. मला खासगी विषयात जायचं नाही. मात्र ज्या ठिकाणी मुख्यमंत्री दाखल असतील तिथे जाऊन तहसीलदार, कलेक्टर यांनी निवेदन पोहचवावे. राज्याने इंधनावरचा 9 टक्के सेस आणि 24 ते 25 टक्के व्हॅट कमी करावा असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

'उद्धव ठाकरे खासगी रूग्णालयात उपचार घेतात, म्हणजे सरकारी रूग्णालयं चांगली नाहीत'
नवाब मलिकांवर देशद्रोहाचा करून NIA मार्फत चौकशी करावी-चंद्रकांत पाटील

आणखी काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

राज्य सरकारवर इंधन दरवाढीवरून चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. केंद्र सरकारने अबकारी कमी, त्यानंतर देशातील भाजपशासित राज्यांनीही राज्यातील कर कमी केला. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारने अद्यापही पेट्रोल-डिझेलवरचा कर कमी केला नाही. त्यामुळे आम्ही आज-उद्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचवा असं म्हणणार आहोत असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

कोरोना प्रतिबंधक लसींच्या बाबतीत महाराष्ट्राने 10 कोटींचा टप्पा ओलांडला असला तरीही आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणं महत्त्वाचं आहे. आपल्याला जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि एनआयएने ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. दररोज सकाळी बोलून संजय राऊत दमले, आता नवाब मलिक बोलत आहेत.संजय राऊत आणि मलिक यांच्यामध्येच स्पर्धा सुरू झाली आहे. संजय राऊत यांना बोर्नव्हिटा पिण्याची गरज आहे. असा टोला संजय राऊत आणि नवाब मालिक यांना चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in