'हे काँग्रेसचे लोक मेले होते... उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये घेतलं म्हणून...'

शिवसेना आमदाराचं नागपूरमध्ये वादग्रस्त वक्तव्य
'हे काँग्रेसचे लोक मेले होते... उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये घेतलं म्हणून...'

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

हे काँग्रेसचे लोक मेले होते, तुम्हाला कुणी विचारत नव्हतं. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सरकारमध्ये घेतलं म्हणून मेलेले लोक जिवंत झाले नाहीतर दोन्ही पक्षांना अशी गळती लागली होती की कुत्रंही विचारायला तयार नव्हते. सर्व सुटकेस बांधून दुसऱ्या पक्षात तयार होते. हे सगळे मेलेले लोक जिवंत झाले आहेत हे मी उघडपणे सांगतो. असं म्हणत शिवसेना आमदार आशिष जयस्वाल यांनी नागपूरमध्ये केलं आहे.

महाविकास आघाडी
महाविकास आघाडीफोटो-इंडिया टुडे

नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांचे जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत दरम्यान प्रचारात काँग्रेस पक्षावर अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली आहे भाषणात बोलताना आमदार आशिष जयस्वाल म्हणाले की काँग्रेस पक्षातील सर्व मेलेले लोक जिवंत झाले आहेत.. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाला सरकार मध्ये घेतलं म्हणून ते जिवंत झाले आहे..

हे काँग्रेसचे लोकांना कुणीही विचारत नव्हते. दोन्ही पक्षांमध्ये गळती लागली होती. कुत्राही विचारत नव्हता. सगळे सुटकेस बांधून दुसऱ्या पक्षात जायला तयार होते आणि तुम्ही शिवसेनेच्या लोकांना डिवचता? एका एका माणसाला पुरून उरणार आहे मी. उद्धव ठाकरेंमुळे मेलेले लोक जिवंत झाले आहेत.

जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणावरील काँग्रेस-राष्ट्रवादीची पारंपरीक पकड मोडून काढत भाजपने 12 वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेवर सेनेच्या मदतीने भगवा फडकावला होता. पाच वर्षे पक्ष राज्यात सत्तेत असल्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्याचा धडाका माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावला होता. मात्र ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपला इथे नाकारले. सहापैकी फक्त दोन जागा भाजपाला मिळाल्या. त्यापैकी एक जागा तर निसटत्या मताने जिंकली. 2014 मध्ये त्यांच्याकडे पाच जागा होत्या. त्यानंतर 2019 पासून काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचा एक असे आघाडीचे तीन आमदार आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in