Shivsena Symbol: धनुष्यबाणाचा वाद दिल्ली हायकोर्टात, ठाकरे गटाची निवडणूक आयोगाविरोधात याचिका

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेत जे दोन गट पडले आहेत त्यांच्यात पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव यावरून झालेला वाद हा निवडणूक आयोगाच्या दारात गेला होता. निवडणूक आयोगाने शनिवारी पक्षचिन्ह म्हणजेच धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दोन्ही गोठवलं. त्यानंतर आता सोमवारी वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाला ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचं सर्वात मोठं बंड

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठं बंड केलं आहे. ज्यानंतर शिवसेना दुभंगली. ठाकरे विरूद्ध शिंदे असे दोन गट शिवसेनेत पडले. ५६ वर्षांत पहिल्यांदाच दोन दसरा मेळावेही पार पडले. या मेळाव्यांमध्येही आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहाण्यास मिळालं त्यानंतर शनिवारी म्हणजेच ८ तारखेला निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव गोठवलं. त्यानंतर आता ही लढाई दिल्ली हायकोर्टात गेली आहे.

एकनाथ शिंदे यांनी केला शिवसेनेवर दावा

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड झाल्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला आहे. शिंदे गटाने पक्षावर दावा केल्यानंतर निवडणूक आयोगात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. शिवसेना आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाने कागदपत्रे मागितली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंची कागदपत्रे तपासल्यानंतर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले. त्याशिवाय, शिवसेना हे मूळ नाव वापरण्यासही मनाई केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गट दिल्ली कोर्टात

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेनेने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार निर्णय झाला नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. आपल्या तीन पर्यायी चिन्हांना संरक्षण मिळावे ही मागणीदेखील शिवसेनेने कोर्टात याचिकेद्वारे केली आहे. आमच्या विचारसरणीशी निगडित चिन्ह फ्री सिम्बॉल यादीत नाही. पण आम्हाला चिन्ह निवडण्याचा अधिकार आहे. त्यानुसारच पर्याय दिले आहेत असेही शिवसेनेने म्हटले आहे. दिल्ली हायकोर्ट या प्रकरणी काय आदेश देते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सोमवारी अथवा मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT