मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचे पुतणे निहार ठाकरे एकनाथ शिंदे गटात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकनाथ शिंदे यांना आता उद्धव ठाकरेंचे पुतणे निहार ठाकरे यांची साथ लाभली आहे. निहार ठाकरे यांनी आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा आणखी एक धक्का मानला जातो आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावरून शरद पवारांचा एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना उपरोधिक टोला

निहार ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर

आदरणीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम एकनाथ शिंदे नक्की करतील असं म्हणत निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मी आज त्यांना शुभेच्छा द्यायला आलो आहे. हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जायला पाहिजे, ते काम एकनाथ शिंदे व्यवस्थित करतील म्हणूनच मी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शाखाप्रमुख पदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांची वाटचाल केली आहे. मी आपल्याच पक्षाच्या माणसाला भेटलो आहे. त्यात वेगळं काय करण्याचं काहीही कारण नाही असंही निहार ठाकरे यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

निहार ठाकरे हे वकील आहेत, त्यांची एक फर्मही आहे. एकनाथ शिंदे यांना कायदेशीर लढाईमध्ये जी काही मदत लागेल त्यामध्ये मी शिंदे गटाच्या पाठीमागे उभा असेन असंही निहार ठाकरे यांनी म्हटला आहे. एकनाथ शिंदे यांना मी आज शुभेच्छा दिल्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जाणारीच खरी शिवसेना आहे असं मला वाटतं असंही निहार ठाकरे यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत निहार ठाकरे?

निहार ठाकरे हे बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. तसचं निहार ठाकरे हे पेशाने वकील असून त्यांची स्वतःची फर्म आहे. राजकारणाबाबत त्यांनी फारसं भाष्य केलेलं नाही. एकनाथ शिंदे यांन जी कायदेशीर पातळीवर मदत लागेल ती करण्यासाठी माझा आणि माझ्या फर्मचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे असं निहार ठाकरे यांनी जाहीर केलं आहे.

ADVERTISEMENT

बिंदुमाधव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे ज्येष्ठ चिरंजीव होते. त्यांचा अपघात झाला त्यातच त्यांचा मृत्यू झाला. बिंदुमाधव ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू होते. त्यांच्याच मुलाने म्हणजेच बिंदूमाधव ठाकरेंच्या मुलाने आता शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. कायदेशीर पातळीवर जी काही मदत लागेल ती मदत आम्ही त्यांना करायला तयार आहोत असंही निहार ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT