काळजीत भर! Omicron मुळे जगातला पहिला मृत्यू, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोनाचा नवा व्हेरिएंट अर्थात ओमायक्रॉन हा घातक ठरणार का? असा प्रश्न निर्माण होतो आहे. कारण आज ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन ओमायक्रॉनमुळे जगातल्या पहिल्या मृत्यू ब्रिटनमध्ये झाल्याची माहिती दिली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे झालेला हा जगातला पहिला मृत्यू ठरला आहे.

काय म्हणाले आहेत बोरिस जॉन्सन?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रोज कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या शेकडो नागरिकांना रूग्णालयात दाखल करावं लागतं आहे. त्यातच आज कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 30 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घ्यावा असं आवाहन बोरिस जॉन्सन यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे ओमायक्रॉनकडे मुळीच दुर्लक्ष करू नका असा सावधगिरीचा इशाराही बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने जगभरातल्या अनेक देशांची काळजी वाढवली आहे. जगभरात हा व्हेरिएंट वेगाने पसरतो आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा कोरोनाची लाट येऊ शकते अशी शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. WHO ने ओमायक्रॉन या व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ कन्सर्नच्या श्रेणीत टाकलं आहे. या व्हेरिएंटबाबत UK च्या वैज्ञानिकांनी एक रिपोर्ट सादर केला आहे. ज्यामध्ये हे नमूद करण्यात आलं आहे की जर या व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी आवश्यक ते उपाय योजले नाहीत तर पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे 25 ते 75 हजार मृत्यू होऊ शकतात. लंडन येथील स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि दक्षिण अफ्रिकेच्या स्टेलनबोश विद्यापीठाच्या संशोधकांनी हा रिसर्च केला आहे.

ADVERTISEMENT

ओमिक्रॉन व्हेरिएंट का धोकादायक मानला जातोय?

ADVERTISEMENT

NGS-SA ने नव्या व्हेरिएंटच्या म्युटेशनबद्दल सांगितलं की ‘B.1.1.529 म्युटेशनची जिनोम सिक्वेन्स (जनुकीय रचना) खूप दुर्मिळ आहे. 30 म्युटेशन व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमध्ये आहेत. स्पाईक प्रोटीन हा असा भाग असतो, जिथे लस परिणामकारक ठरते. त्याचबरोबर स्पाईक प्रोटीनद्वारेच व्हायरस मानवी शरीरात प्रवेश करून शरीरातील पेशी संक्रमित करण्यास सुरूवात करतो.

यात काही म्युटेशन आधीपासूनच असल्याचं आढळून आलं आहे. ज्यात अल्फा आणि डेल्टाचे म्युटेशनचा समावेश आहे. आतापर्यंत क्वचित असं आढळून आलं आहे, असंही NGS-SA ने या ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटबद्दल म्हटलं आहे. व्हायरस प्रभावित करण्याची क्षमता आणि लसीचा प्रभाव याबद्दलचा अभ्यास केला जात असल्याचं आफ्रिकेतील साथरोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सेंटर फॉर डिजिज कंट्रोल) म्हटलं आहे.

दक्षिण आफ्रिकेतील सेंटर फॉर एपिडमिक रिस्पॉन्स अॅण्ड इनोव्हेशनचे संचालक प्रो. टुलियो डी ओलिवीरा यांनीही ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल माहिती देताना सांगितलं की, ‘हे म्युटेशन एका गुच्छाप्रमाणे आहे. यापूर्वी पसरणाऱ्या व्हेरिएंटपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे.’

ओमिक्रॉनच्या रिसेप्टर बायडिंग डोमेनमध्ये 10 वेगवेगळे म्युटेशन असून, रिसेप्टर बायडिंग डोमेन हा भागच शरीरातील पेशींच्या सर्वात आधी संपर्कात येता. डेल्टा व्हेरिएंटच्या रिसेप्टर बायडिंग डोमेनमध्ये 2 म्युटेशन होते.

Omicron : हाच ट्रेंड दुसरी लाट येण्यापूर्वी दिसला; ‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर केंद्राचा इशारा

लस प्रभावी आहे का?

कोरोनाच्या उद्रेकानंतर चीनमध्ये आढळून आलेल्या कोरोना म्युटेशनच्या आधारावर लसीचा शोध घेण्यात आला. मात्र, कोरोना मूळ व्हेरिएंट आणि दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या व्हेरिएंट वेगवेगळे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या व्हेरिएंटवर लस किती प्रभावी ठरणार याबद्दल शास्त्रज्ञांनी काही म्हटलेलं नाही. नवीन म्युटेशन असल्यानं कदाचित लस प्रभावी ठरू शकणार नाही, किंवा काही तिची परिणामकारकता कमी होऊ शकते. याबद्दल आता अभ्यास केला जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT