'सचिन वाझेवर जबाब नोंदवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा प्रचंड दबाव होता'

सचिन वाझे या दबावामुळेच CrPC १६४ अन्वये जबाब नोंदवण्याच्या विचारात होते असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं आहे
'सचिन वाझेवर जबाब नोंदवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा प्रचंड दबाव होता'

महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचा प्रचंड दबाव असल्याने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे त्याचा जबाब CrPC 164 अन्वये नोंदवू इच्छितो अशी माहिती बॉम्बे हायकोर्टात देण्यात आली आहे. मुंबईतील हॉलिडे मॅजिस्ट्रेट कोर्टाने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला 15 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. गोरेगाव खंडणी प्रकरणाचा तपास करण्याच्या उद्देशाने गुन्हे शाखेने आणखी दोन दिवसांची कोठडी मागितली. वाझे यांच्या वकील आरती कालेकर यांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांनी रिमांडच्या शेवटच्या सुनावणीदरम्यान क्राइम ब्रँचची विनंती मान्य केली होती आणि आताही तसे करण्यास आम्ही सहमत आहोत.

मुंबईतील हॉलिडे मॅजिस्ट्रेट कोर्टाने मुंबईचे माजी पोलिस शिपाई सचिन वाळे याला १५ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले आहे. गोरेगाव खंडणी प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेने आणखी दोन दिवसांची कोठडी मागितली आहे.

'सचिन वाझेवर जबाब नोंदवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा प्रचंड दबाव होता'
सचिन वाझे उपचार घेत असलेल्या हॉस्पिलमध्ये कडक पोलिस बंदोबस्त

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या आरोपाची चौकशी करणार्‍या अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) वाझे यांची चौकशी करण्यासाठी थोडा वेळ मिळण्याची आशा होती. ईडीने शुक्रवारी देशमुख यांच्या पुढील कोठडीची मागणी करताना न्यायालयाला सांगितले होते की, त्यांना वाझे यांचा जबाब नोंदवायचा आहे आणि त्यानंतर देशमुख यांच्याशी सामना करावा लागेल. देशमुख यांची ईडीकडे असलेली कोठडी मात्र 15 नोव्हेंबरला संपत आहे आणि त्यामुळे एजन्सी वाझे यांची चौकशी करू शकणार नाही हे स्पष्ट आहे.

सचिन वाझे
सचिन वाझे

शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, कालेकर यांनी न्यायालयाला सांगितले की, सचिन वाझे यांच्यावर राज्य आणि केंद्राकडून प्रचंड दबाव होता, त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 164 अन्वये त्यांचे म्हणणे नोंदवण्याचा विचार करत होते.

अँटिलिया बॉम्ब आणि व्यापारी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे माजी सहायक पोलिस निरीक्षक वाझे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. सचिन वाझेला अटक करून केंद्रीय एजन्सीच्या ताब्यात असताना त्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार आणि खंडणीचे गंभीर आरोप करणारे आणि पमरबीर सिंग यांचे समर्थन करणारे विधान केले होते. वाझे हा ईडीच्या खटल्यातही आरोपी आहे पण त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. ईडीने तळोजा कारागृहात त्याचे जबाब नोंदवले आहेत.

मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून सचिन वाझे हा स्थानिक पोलिसांच्या ताब्यात असून त्यांनीही त्याचा जबाब नोंदवला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या कोठडीची मागणी करताना गुन्हे शाखेने सांगितले की, वाझेने या प्रकरणातील वॉन्टेड आरोपी परमबीर सिंगबाबत योग्य माहिती दिलेली नाही. एजन्सीला अधिक माहिती हवी आहे आणि म्हणूनच कोठडीची गरज आहे. वाझेकडून खंडणीचे पैसे अद्याप परत मिळालेले नाहीत आणि एजन्सीला हे पैसे कसे हस्तांतरित केले गेले आणि ते कसे वितरित केले गेले हे शोधणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in