Budget 2022 : 'अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे सरकारचं विशेष लक्ष्य'; पहा राष्ट्रपतींचं अभिभाषण

Budget 2022 Update : संसदीय अधिवेशनाचं कामकाज दोन सत्रांमध्ये होणार
अभिभाषण करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद.
अभिभाषण करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद.

देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू असतानाच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. मागील वर्षीप्रमाणे यंदाही संसदीय अधिवेशनाचं कामकाज दोन सत्रांमध्ये होणार असून, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरूवात झाली. राष्ट्रपतींनी सरकारकडून केल्या गेलेल्या कामांचं कौतुक केलं.

असं चालणार अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज...

दोन सत्रांमध्ये अधिवेशन होणार असून, पहिलं सत्र २ ते ११ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वार्धात दोन्ही सभागृहांचं कामकाज पाच तास चालणार आहे. राज्यसभेचं कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत, लोकसभेचं कामकाज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालणार आहे. अभिभाषणानंतर आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला जाणार असून, उद्या म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in