Union Budget 2023 : काय स्वस्त, काय महाग; खिशावर कसा होणार परिणाम?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Budget 2023, heaper, costlier Items : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा (Modi Government) शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प (Budget 2023-24) मांडण्यात आला. नागरिकांचं लक्ष बजेटकडे असतं, ते कराची (Tax) मर्यादा आणि कोणत्या गोष्टी महाग होणार याकडे. यावेळच्या बजेटमुळेही काही गोष्टी स्वस्त, तर काही गोष्टी महाग होणार आहेत. (What will be cheaper, what will be costlier)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलीये की, मोबाईलचे सुटे भाग, कॅमेरा लेन्स, लिथिअम सेल यांच्या आयातीवरील सीमा शुल्कात कपात करण्यात येईल. त्याचबरोबर सरकारने इलेक्ट्रिक वाहनात वापरल्या जाणाऱ्या बॅटरीवरील सीमा शुल्क रद्द केलं आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या कमी कमी होणार आहे. आयात केल्या जाणाऱ्या सिगारेटवरील शुल्क 16 टक्के करण्यात आलंय.

खेळणी, सायकल, कॅमेऱ्याच्या लेन्स, लिथिअम बॅटरी होणार स्वस्त…

खेळणी आयातीवरील सीमा शुल्क कपात करून 13 टक्के करण्यात आलं आहे. त्यामुळे खेळणी स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर सायकलही स्वस्त होणार आहे. लिथिअम बॅटरी सीमा शुल्क कमी करण्यात आल्यानं स्वस्त होणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मोबाईल फोनमध्ये वापरण्यात येणारी लिथिअम बॅटरीवरील सीमा शुल्क हटवण्यात आल्यानं या बॅटरी स्वस्त होतील. त्याचा परिणाम मोबाईलच्या किंमती कमी होण्यात होणार आहे.

Budget 2023: PM मोदींनी दिलं मोठं गिफ्ट, 7 लाखापर्यंतचं उत्पन्न Tax Free

ADVERTISEMENT

एलईडी आणि देशी चिमनीच्या किंमती होणार कमी

सरकारने टेलिव्हिजन पॅनलवरील आयात शुल्क 2.5 टक्के केलं आहे. त्याचबरोबर किचनमधील इलेक्ट्रिक चिमनीवरील आयात शुल्कही कमी केलं आहे. त्यामुळे देशी किचन चिमनी स्वस्त होणार असून, एलईडी टीव्ही आणि बायोगँसशी संबंधित वस्तू स्वस्त होणार आहे.

ADVERTISEMENT

Union Budget 2023 Live Updates : निर्मला सीतारामन यांच्या सात घोषणा

सिगारेट-आयात ज्वेलरी होणार महाग

यंदाच्या बजेटमुळे काही वस्तू महागही होणार आहे. सिगारेटवर आपत्ती संबंधी शुल्क वाढवण्यात आलं आहे. सिगारेटवर आकस्मिकता शुल्क 16 टक्के करण्यात आलं आहे. त्यामुळे सिगारेट महाग होणार आहे. त्याचबरोबर सोनं आणि चांदी आणि प्लॅटिनमपासून बनलेल्या इम्पोर्टेड ज्वेलरी महाग होणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT